BMC वर भडकली कंगना, ऑफिसचे फोटो शेअर करत म्हणाली - 'हा माझ्या स्वप्नांचा बलात्कार' By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 05:12 PM 2020-09-17T17:12:32+5:30 2020-09-17T17:18:17+5:30
८ दिवसांआधी बीएमसीने कंगनाच्या ऑफिसमधील अवैध बांधकाम पाडलं होतं. ज्याचे फोटो तिने आता ट्विटरवर शेअर केले आहे. इतकेच नाही तर बीएमसीवर संताप व्यक्त करत तीन ट्विट केले आणि लिहिले की, 'हा तिच्या स्वप्नांचा बलात्कार नाही का?'. कंगना रणौत गेल्या काही दिवसांपासून तिच्या ऑफिसवरून आणि सुशांत सिंह राजपूत केसवरून काहीना काही वादग्रस्त विधान करून सतत चर्चेत आहे. ८ दिवसांआधी बीएमसीने कंगनाच्या ऑफिसमधील अवैध बांधकाम पाडलं होतं. ज्याचे फोटो तिने आता ट्विटरवर शेअर केले आहे. इतकेच नाही तर बीएमसीवर संताप व्यक्त करत तीन ट्विट केले आणि लिहिले की, 'हा तिच्या स्वप्नांचा बलात्कार नाही का?'.
बीएमसीने ९ सप्टेंबरला कंगनाच्या पाली हिल येथील ऑफिसवर कारवाई केली होती आणि ऑफिसमधील अवैध बांधकाम तोडलं होतं. बीएमसीच्या टीमने साधारण २ तास जेसीबीच्या मदतीने बांधकामाची तोडफोड केली.
यादरम्यान कंगनी हिमाचलवरून मुंबईत आली होती. कंगनाने बीएमसीच्या कारवाईवर हाय कोर्टतून स्टे मिळवला आहे. या प्रकरणावर आता २२ सप्टेंबरला सुनावणी होईल.यादरम्यान कंगनी हिमाचलवरून मुंबईत आली होती. कंगनाने बीएमसीच्या कारवाईवर हाय कोर्टतून स्टे मिळवला आहे. या प्रकरणावर आता २२ सप्टेंबरला सुनावणी होईल.
आता कंगनाने बीएमसीवर राग व्यक्त करत एकापाठी एक तीन ट्विट केलेत. त्यात तिने लिहिले की, हा बलात्कार आहे माझ्या स्वप्नांचा, माझ्या ध्यैर्याचा, माझ्या सन्मानाचा आणि माझ्या भविष्याचा'.
दुसऱ्या ट्विटमध्ये तिने लिहिले की, 'एक काळ निघून जातो घर बनवण्यात आणि तुम्ही घरे जाळताना तुम्ही आह सुद्धा करत नाही. हे बघा काय करून ठेवलंय माझ्या घराला. काय हा बलात्कार नाही?'.
मीडिया रिपोर्ट्नुसार, बीएमससीच्या कारवाईत कंगनाला २ कोटी रूपयांचं नुकसान झालं. कंगनाच्या या तीन मजली ऑफिसला उभारण्यासाठी साधारण ४८ कोटी रूपये लागले होते.
कंगना म्हणाली होती की, 'तिच्याकडे आता हे घर पुन्हा बांधण्यासाठी पैसे नाहीत. ती या पडक्या ऑफिसमधूनच काम करेल'.