हिरोईनच्या पतीनेच केली होती तिची हत्या, मुलांवर गोळ्या झाडून स्वतः केली होती आत्महत्या By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 02:18 PM 2022-03-06T14:18:03+5:30 2022-03-06T14:52:47+5:30
Actress Murder : सईदा खान ही हिंदी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक होती. एकेकाळी पडद्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या सईदाने आपल्या कारकिर्दीत किशोर कुमार, राज कुमार, मनोज कुमार, विश्वजित यांसारख्या सुपरस्टार्ससोबत काम केले, पण या सुंदर नायिकेचा शेवट इतका वेदनादायी होता असेल हे ऐकून धक्का बसेल. आजही सईदाची दु:खद कहाणी कोणी ऐकली तर डोळ्यांत पाणी येते. सईदा खान यांचा जन्म 24 ऑक्टोबर 1949 रोजी एका मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव अन्वर जा बेगम होते. सईदा खानला लहानपणापासूनच चित्रपटात काम करण्याची आवड होती. तिने नायिका बनण्याचे स्वप्न पाहिले. एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक एचएस रवैल यांची भेट घेतली. त्यांनी सईदा खान यांना 'कांच की गुडिया' या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. या चित्रपटात सईदा यांच्यासोबत मनोज कुमार दिसला होता.
सईदा खानने प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता ब्रज सदनासोबत प्रेमविवाह केला होता आणि ती आपल्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी होती. ती म्हणायची की ,माझा नवरा खूप चांगला आहे आणि माझ्यावर खूप प्रेम करतो, पण जेव्हा लोकांना कळले की, सईदाची हत्या तिच्या पतीनेच केली तेव्हा कोणाचाही यावर विश्वास बसला नव्हता. (All Photo - Social Media)
सईदा खानचे चित्रपटांमध्ये पदार्पण चांगले झाले होते, तिने अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले. पण, नंतर चित्रपट मिळण्यात जोर कमी पडला. त्यामुळे त्यांनी बी आणि सी ग्रेड चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. सईदा यांचे पती प्रसिद्ध निर्माता आणि लेखक होते, त्यांनी अनेक मोठे सुपरहिट चित्रपट केले होते. सईदा खान यांना दोन मुले, एक मुलगी नम्रता आणि मुलगा कमल.
21 ऑक्टोबर 1990 रोजी सईदा खान यांचा मुलगा कमल याचा 20 वा वाढदिवस होता. त्या दिवशी तो त्याच्या खोलीत मित्रांसोबत पार्टी करत होता. हा तो दिवस होता जेव्हा कमलच्या वडिलांनी त्याच्या संपूर्ण कुटुंबावर गोळीबार केला होता.
कमल सांगतात, माझे आई-वडील नेहमी एकमेकांशी भांडायचे. माझ्या वाढदिवशीही दोघांचे भांडण झाले, माझ्या वडिलांना खूप राग आला आणि रागाच्या भरात त्यांनी खूप दारू प्यायली आणि हातात बंदूक घेतली. हे सर्व पाहून माझी आई सईदा घाबरली.
कमल हा निर्माता आणि दिग्दर्शक ब्रिज सदनाचा मुलगा आहे. त्याने लिसा जॉन या मेक-अप आर्टिस्टशी लग्न केले आहे. त्याला अंगथ नावाचा एक मुलगा आहे. कमलचा21 ऑक्टोबर 1990 रोजी आपला 20 वा वाढदिवस होता. त्यादिवशी वडील, आई सईदा खान आणि बहीण नम्रता यांना गमावले. त्यांच्या वडिलांनी त्यांच्या आई व बहिणीवर गोळ्या झाडून स्वतःवर देखील गोळ्या झाडून आत्महत्या केली.