संपत्तीच्या बाबतीत बायको ठरणार वरचढ; जाणून घ्या, विग्नेश-नयनताराचं Net worth

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 11:34 AM2022-06-09T11:34:15+5:302022-06-09T11:38:43+5:30

Nayanthara and vignesh shivan: विग्नेश आणि नयनतारा दाक्षिणात्य कलाविश्वातील प्रसिद्ध जोडी असून या दोघांची एकूण संपत्ती किती ते पाहुयात.

दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) लवकरच लग्नाच्या बेडीत अडकली जाणार आहे.

९ जून म्हणजे आज मोठ्या थाटात नयनतारा आणि विग्नेश शिवन (Vignesh Shivan) लग्नगाठ बांधणार आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर या जोडीची चर्चा रंगली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, महाबलीपुरम येथील शेरेटन गार्डमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा रंगणार आहे. त्यामुळे सध्या नयनतारा आणि विघ्नेश यांच्या घरी लगबग सुरु असल्याचं पाहायला मिळतं.

नयनतारा आणि विग्नेश यांनी लग्नाचा निर्णय घेतल्यापासून सोशल मीडियावर त्यांच्या लव्हस्टोरीपासून ते प्रोफेशनल लाइफपर्यंत अनेक गोष्टींची चर्चा रंगली आहे.

विग्नेश आणि नयनतारा दाक्षिणात्य कलाविश्वातील प्रसिद्ध जोडी असून या दोघांची एकूण संपत्ती किती ते पाहुयात.

सूत्रांच्या माहितीनुसार, नयनताराचा जन्म हवाई दलाच्या एका प्रतिष्ठित अधिकाऱ्याच्या घरी झाला. तिची एकूण संपत्ती ७१ कोटी रुपये इतकी आहे.

नयनतारा एका चित्रपटासाठी जवळपास ३ ते ५ कोटी रुपये मानधन घेते. तसंच अनेक ब्रँडचं प्रमोशन, ब्रँड अम्बँसिडर असल्यामुळे तेथूनही तिची आर्थिक कमाई होते.

विग्नेश एक दिग्दर्शक आणि गीतकार आहे. त्याची एकूण संपत्ती ५० कोटी रुपये आहे.

विग्नेश एका चित्रपटासाठी १ ते ३ कोटी रुपये चार्ज करतो.

विग्नेश प्रसिद्ध गीतकार असल्यामुळे तो एका गाण्यासाठीदेखील ३ लाखांपर्यंत मानधन घेतो.

विग्नेश आणि नयनतारा यांची एकूण संपत्ती पाहिली तर दोघांची मिळून ते १२० कोटींपेक्षा जास्त संपत्तीचे मालक असल्याचं पाहायला मिळतं.