1300 कोटींची प्रॉपर्टी असलेल्या दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरणचं आलिशान घर पाहिलंय का?, पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 02:16 PM2021-12-28T14:16:21+5:302021-12-28T14:26:44+5:30

Ram charan: रामचरणचं स्वतःचे प्रोडक्शन हाऊसदेखील आहे ज्याचं नाव आहे कोनिडेला प्रॉडक्शन कंपनी.

दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता चिरंजीवी याचा मुलगा राम चरण याच्याविषयी प्रत्येकालाच ठावूक आहे. राम चरण याने आजवरच्या कारकिर्दीमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

२००७ साली 'चिरुथा' चित्रपटातून त्याने कलाविश्वात पदार्पण केलं.तेव्हापासून आतपर्यंत तो सातत्याने सुपरहिट चित्रपट देत असल्याचं पाहायला मिळतं.

प्रोफेशनल लाइफसोबतच राम चरणची पर्सनल लाइफदेखील अनेकदा चर्चेत येत असते. यात त्याच्या कुटुंबाविषयी, त्याच्या संपत्तीविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात.

साधारणपणे एका चित्रपटासाठी १५ ते २० कोटी रुपये मानधन घेणाऱ्या राम चरण याचं घर आतून कसं दिसतं ते पाहुयात.

राम चरण याचं घर हैदराबादमधील जुबली हिल्स सारख्या प्राईम लोकेशनमध्ये आहे.

राम चरण राहत असलेल्या बंगल्याची किंमत ३८ कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतं. विशेष म्हणजे राम चरणचं हे घर दाक्षिणात्य सेलिब्रेटींमधील सर्वात महागडं घर आहे.

राम चरण चित्रपटांव्यतिरिक्त ब्रॅण्ड एंडोर्समेंट्स आणि पर्सनल इन्व्हेसमेंटमधून पैसे कमावतो. सोबतच तो एक यशस्वी व्यावसायिकदेखील आहे.

रिपोर्ट्सनुसार, राम चरणची जवळपास १३०० कोटींची प्रॉपर्टी आहे. रामचरण हैदराबादमधील एअरलाईन ट्रू जेटचा मालिक आहे.

याशिवाय त्याची रामचरण हैदराबाद पोलो राइडिंग क्लब नामक पोलो टीम देखील आहे. तो माँ टीव्हीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये देखील आहे.

रामचरण एका सिनेमासाठी जवळपास १२ ते १५ कोटी रुपये मानधन घेतो. परंतु, एस. एस. राजमौली यांच्या , ‘आरआरआर’ या सिनेमासाठी त्याने 45 कोटी रूपये चार्ज केल्याचे सांगण्यात येतं.

रामचरणचं स्वतःचे प्रोडक्शन हाऊसदेखील आहे ज्याचं नाव आहे कोनिडेला प्रॉडक्शन कंपनी.

रामचरणने १४ जून, २०१२ साली अपोलो हॉस्पिटलमधील एक्झिक्युटिव्ह चेअरमन प्रताप सी. रेड्डीची नात उपासना कमिनेनीसोबत लग्न केले आहे.