श्रीदेवी ते काजोल... या स्टार्सची खरी नावे तुम्हाला माहित आहेत का? By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 01:01 PM 2020-08-23T13:01:23+5:30 2020-08-23T13:07:36+5:30
नावात काय आहे? असा प्रश्न शेक्सपिअरने विचारला असला तरी नावातच सर्व काही आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, बॉलिवूड कलाकार. बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी स्वत:चे नाव बदलले. पण या स्टार्सची खरी नावे तुम्हाला ठाऊक आहेत का? असिन - साऊथ इंडस्ट्रीतून बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री करणारी अभिनेत्री असिनचे खरे नाव असिन थोट्टूमकल आहे. सरनेम कठीण असल्याने बॉलिवूडमध्ये तिने असीन या नावाने एन्ट्री घेतली. आज सर्व जण तिला तिच्या नावानेच ओळखतात.
हेलन - डान्सर व अॅक्ट्रेस हेलन यांचे पूर्ण नाव हेलेन एन रिचर्डसन आहे. लग्नानंतर त्यांचे नाव हेलेन एन रिचर्डसन खान आहे. इतके मोठे नाव असल्याने हेलन यांनी केवळ हेलन हेच नाव लिहिणे सुरु केले आणि पुढे हीच त्यांची ओळख बनली.
रेखा - सदाबहार अभिनेत्री रेखा यांचे पूर्ण नाव भानुरेखा गणेशन आहे. रेखा हे त्यांच्या फर्स्ट नेमचा भाग आहे. एकार्थाने ते त्यांचे मिडल नेम आहे. बॉलिवूडमध्ये आल्यानंतर त्यांनी भानु व गणेशन गाळून रेखा हे नाव धारण केले.
रणवीर सिंग - रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. बॉलिवूडमध्ये येण्याआधी त्याने आडनाव हटवले. आज तो रणवीर सिंग याच नावाने ओळखला जातो.
काजोल - काजोल नावापुढे आडनाव लावत नाही. तिचे पूर्ण नाव काजोल सोमू मुखर्जी आहे. अभिनेत्री व दिग्दर्शक सोमू मुखर्जी यांची ती लेक़ आई-वडील वेगळे झाल्याने काजोलने कधीच आपल्या नावापुढे आडनाव लावले नाही.
जितेन्द्र - सुपरस्टार जितेन्द्र यांचे खरे नाव रवी कपूर आहे. बॉलिवूडमध्ये जितेन्द्र या नावाने त्यांनी एन्ट्री घेतली आणि पुढे ते याच नावाने लोकप्रिय झालेत.
धर्मेन्द्र - सुपरस्टार धर्मेन्द्र यांचे पूर्ण नाव धर्मेन्द्र सिंह देओल आहे. बॉलिवूडमध्ये त्यांना धरमपाजी, धरमजी अशी नावेही दिलीत. पण धर्मेन्द्र याच नावाने ते लोकप्रिय झालेत.
गोविंदा - गोविंदाचे पूर्ण नाव गोविंदा अरूण आहुजा आहे. वडिलांचे नाव आणि आहुजा हे आडनाव हटवण्यामागे तसे काहीही खास कारण नाही.
श्रीदेवी - दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचे पूर्ण नाव श्रीअम्मा यांगर अय्यपन होते. या नावाचा उच्चार कठीण असल्याने त्यांनी श्रीदेवी हे सुटसुटीत नाव धारण केले होते.
तब्बू- अॅक्टिंगच्या दुनियेत आजही अॅक्टिव्ह असलेली अभिनेत्री तब्बू हिचे खरे नाव तब्बसुम हाशमी आहे. नाव साधेसोपे व लहान असावे यासाठी तिने तब्बू हे नाव ठेवले आणि याच नावाने ती ओळखली जाऊ लागली.