Sunny leoni's entry in Kangana-Urmila controversy, critics on kangna about porn star comment
कंगना-उर्मिला वादात सनीची एंट्री, पॉर्न स्टार कमेंटवरुन लगावला टोला By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 02:56 PM2020-09-18T14:56:42+5:302020-09-18T15:20:53+5:30Join usJoin usNext अभिनेत्री कंगना रणौत इतर कलाकारांप्रमाणे अभिनेत्री उर्मिला मातोंडकरवरही नाराज आहे. दोघींमध्ये होणारी तू-तू-मैं-मैं सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पण आता उर्मिलाला हा वाद वाढवण्यात अजिबात इंटरेस्ट दिसत नाही. उर्मिलाने एका मुलाखतीत कंगनाला 'रुदाली' म्हटलं होतं. आता ती म्हणाली की, याचं कंगनाला वाईट वाटलं असेल तर ती माफी मागायला तयार आहे. एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत उर्मिला म्हणाली की, तिने कंगनाला रुदाली एका खास संदर्भात म्हटलं होतं. आणि जर तिला याचं वाईट वाटलं असेल तर ती यावर तिची माफी मागायला तयार आहे. मी कंगनाची माफी मागून काही लहान होणार नाही. उर्मिला म्हणाली की, तिने तो शब्द केवळ तिने यासाठी वापरला होता. कारण तिला हे कळत नव्हतं की एखादी व्यक्ती पुन्हा पुन्हा विक्टिम कार्ड का खेळत आहे. तिला वाटतं की, असं तर कुणीही करू शकतं. कंगना राणौतने मुंबईला पाकव्याप्त काश्मीर संबोधले होते. त्यानंतर तिला खूप विरोध झाला होता. याशिवाय कंगनाने म्हटले होते की बॉलिवूडमध्ये असे कित्येक लोक आहेत जे ड्रग्सचं सेवन करतात आणि त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. उर्मिला मातोंडकरने कंगनाला चांगलेच सुनावले. उर्मिला म्हणाली की, संपूर्ण देश ड्रग्स समस्याने पीडित आहे. काय कंगनाला माहित नाही आहे की हिमाचल ड्रग्सचा गड आहे? तिला ही लढाई आपल्या गृह राज्यातून सुरू केली पाहिजे. कंगना आणि उर्मिलातील वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा उर्मिला कंगनाच्या महाराष्ट्र आणि ड्रग्सच्या वक्तव्यावर म्हणाली होती की तिने सुरूवात तिच्या हिमाचल राज्यापासून करावी. उर्मिलाच्या विधानामुळे नाराज कंगनाने टाइम्स नाउला दिलेल्या मुलाखतीत उर्मिला मातोंडकरला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हटलं होतं. कंगनाच्या या टिकेवर सोशल मीडियातून निषेध व्यक्त होत आहे. कंगना उर्मिलाच्या या वादात पॉर्न स्टार म्हटल्यामुळे कंगनाने सनी लिओनीचे नाव घेत, माझा हेतू उर्मिलाचा अपमान करण्याचा नव्हता. अखेर, बॉलिवूड इंडस्ट्रीने सनी लिओनीलाही स्विकारलं आहे ना, असेही कंगना म्हणाली होती. कंगनाने आपले नाव या वादात ओढल्यानंतरही सनीनेही नाव न घेता कंगनावर निशाणा साधला. सनी लिओनीने इंस्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत ती स्वत: दिसत असून तिने लंच डेट कॅचिंग ऑन वर्ल्ड ड्रामा असे कॅप्शनही त्या फोटोला दिलंय. सनीने दुसऱ्या फोटोत काही ओळी लिहित कंगनावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. तुमच्याबद्दल कमीत कमी माहिती असलेले लोकच तुमच्याबद्दल जास्तीत जास्त सांगत असतात, हे मजेशीर आहे, असे म्हणत कंगनाला सनीने टोला लगावला सनी लिओनीने पॉर्न इंडस्ट्री ते बॉलिवूड हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता, असे सांगत. येथील लोकांनी, चाहत्यांनी मला स्विकारलं म्हणून मी इथे दिसतेय, असेही हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना म्हटलंय.टॅग्स :कंगना राणौतसनी लियोनीमुंबईउर्मिला मातोंडकरKangana RanautSunny LeoniMumbaiUrmila Matondkar