Sushant Singh Rajput Case : यूरोप ट्रिपवर 'ही' पेंटिंग पाहून बदलली होती सुशांतची वागणूक, रियाने केला आश्चर्यकारक दावा! By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 11:12 AM 2020-08-12T11:12:57+5:30 2020-08-12T11:31:29+5:30
Sushant Singh Rajput Case : रियाने तिच्या जबाबात सांगितले की, ते दोघेही फ्लोरेंसला फिरायला गेले होते तेव्हा तिला पहिल्यांदा समजले की, सुशांत एखाद्या मानसिक आजाराशी लढत आहे. बॉलिवूड अभिनेत्री सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आता रिया चक्रवर्तीने आता एक अशी कहाणी सांगितली आहे जी ऐकून सर्वजण हैराण झाले आहेत. रियाने सांगितले की, ऑक्टोबर २०१९ मध्ये इटलीच्या फ्लोरेंस शहरात सुशांत, ती आणि शोविक सुट्टी घालवण्यासाठी गेले होते तेव्हा काय झालं होतं.
रियाने तिच्या जबाबात सांगितले की, ते दोघेही फ्लोरेंसला फिरायला गेले होते तेव्हा तिला पहिल्यांदा समजले की, सुशांत एखाद्या मानसिक आजाराशी लढत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाने सांगितले की, या ट्रिप दरम्यान ते ६०० वर्षे जुन्या हेरिटेज हॉटेलमध्ये थांबले होते. हॉटेलमधील रूम्सही मोठमोठ्या होत्या. आणि येथील भींतींवर जुन्या पेंटिंग्स टांगलेल्या होत्या. यातील एका पेंटिंगमध्ये सॅटर्न आपल्या बाळाला खाताना दाखवला होता.
रिया तिच्या भावासोबत दुसऱ्या रूममध्ये होती. पण जेव्हा परत आली तेव्हा तिने पाहिले की, सुशांत रूद्राक्षाची माळ घेऊन काही मंत्रांचा जप करत होतो आणि वेगळा दिसत होता.
जेव्हा रियाने विचारले की, काय झाले? त्यावर तो म्हणाला की, तो त्या पेंटिंगमधील कॅरेक्टरला बघू शकत आहे. तो याबाबत जास्त स्पष्टपणे सांगू शकला नव्हता. त्या रात्री रिया आणि तिचा भाऊ सुशांतच्याच रूममध्ये झोपले होते.
सुशांतला पेंटिंगमुळे काही अजब गोष्टी दिसू लागल्या होत्या आणि रिया त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती की, हा सगळा भ्रम आहे. त्यानंतर रिया आणि सुशांत शोविकसोबत तेथून ऑस्ट्रियातील डिटॉक्सिफिकेशन सेंटरमध्ये गेले होतो. पण तिथेही बरं वाटत नसल्याने तेथूनही निघून गेले.
ज्या पेंटिंगचा रियाने उल्लेख केला ती पेंटिंग स्पॅनिश आर्टिस्ट फ्रॅन्सिस्को गोयाने तयार केली होती. या पेंटिंगमध्ये दाखवण्यात आले आहे की, सॅटर्न नावाचा राक्षस आपल्या नवजात बाळाला खात आहे. ही पेंटिंग गोयाने तयार केलेल्या काही मोजक्या डार्क पेंटिंगपैकी एक होती.
रियानुसार, दोघेही २ नोव्हेंबरला परत येणार होते. पण त्यांना आधीच २८ ऑक्टोबरला यावं लागलं होतं. रियानुसार, परत येताना सुशांतची ऊर्जा फार कमी होती आणि तो तासंतास शांत राहू लागला होता.
रियाने सांगितले की, परत आल्याावर सुशांतची तब्येत वेगाने खालावत होती आणि तो अनेकदा ओरडत होता. अनेकदा अचानक रडायला लागला होता. पोलिसांनुसार, सुशांत बायपोलर डिसऑर्डरची ट्रिटमेंट घेत होता.
रियाने सांगितले की, ती पूर्ण वेळ त्याच्यासोबत होती आणि ८ जूनला सुशांतने रियाला सांगितले होते की, तिने परत जावं. याने त्याला बरं होण्यास मदत होईल. यादरम्यान रियाच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाला होता. त्यामुळे तिने एका मानसोपचार तज्ज्ञांचीही अपॉयमेन्ट घेतली होती.