10 Things That Have Changed From 1 September
कर्ज, घर अन् ट्रेन! आजपासून 'या' 10 बदलांमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडणार? By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2019 12:20 PM2019-09-01T12:20:47+5:302019-09-01T12:26:57+5:30Join usJoin usNext 1 सप्टेंबरपासून देशात 11 मोठे बदल घडणार आहेत. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. 1 वर्षात बँक खात्यातून 1 कोटींपेक्षा अधिक रक्कम काढल्यास 2 टक्के टीडीएस लागणार आहे. SBI, PNB सह 8 बँकांचे रेपो रेट आरबीआयशी जोडले जाणार आहेत. जर आरबीआयने रेपो रेटमध्ये घट केली तर ग्राहकांच्या कर्जावरील व्याजदरही कमी होणार आहे. घर खरेदी करताना तुम्हाला जास्त टीडीएस द्यावा लागणार आहे. कारण आता आपल्याला क्लब मेंबरशिप आणि कार पार्किंगसारखी सुविधांचे पैसे प्रॉपर्टीच्या दरात जोडून टॅक्समध्ये सूट मिळवू शकत नाही. घराची दुरुस्तीसाठी जर तुम्ही कंत्राटदाराला 50 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम देत असाल तर त्यावर 5 टक्के टीडीएस द्यावा लागणार आहे. भूकंप आणि पूर परिस्थिती तसेच हिंसक घटनांमध्ये होणाऱ्या वाहनांच्या नुकसानीसाठी विमा घेऊ शकता. ऑन डॅमेज आणि थर्ड पार्टी विमा एकाच कंपनीकडून घेण्याची सक्ती नसेल. ज्या लोकांनी अद्याप पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक केलं नाही. त्यांना इनकम टॅक्स विभागाकडून नवीन पॅनकार्ड जारी करण्यात येईल. ज्या लोकांचे सेवा कर अथवा केंद्रीय उत्पादन कर यांची थकबाकी असेल असा विवादीत प्रकरणात लोकांना काहीप्रमाणात दिलासा देण्यासाठी सरकारने नवीन योजना आणली आहे. नवीन मोटार वाहन कायदा लागू झाल्याने बेशिस्त वाहन चालकांना चाप बसविण्यासाठी आता दंडाची रक्कम 30 पटीने वाढली आहे. जर यापुढे तुम्ही 50 हजारांपेक्षा अधिक व्यवहार केला तर त्याची माहिती तुमची बँक आयकर विभागाला देणार आहे. त्यामुळे टॅक्स रिटर्न तपासासाठी तुमच्या छोट्या व्यवहाराची माहितीही आयकर विभाग मागू शकतं. भारतीय रेल्वे तिकीट बुकींग पोर्टलवरून ऑनलाइन तिकीट खरेदी केल्यास त्यासाठी सर्व्हिस टॅक्स भरावा लागणार आहे.टॅग्स :अर्थव्यवस्थाEconomy