महिन्याला फक्त २५० रुपयांत १७ लाखांचा फंड होईल जमा; एसआयपीचं गणित समजून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 11:18 IST2025-03-09T11:15:07+5:302025-03-09T11:18:22+5:30

SIP calculator: तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी खूप मोठी रक्कम लागत नाही. फक्त गुंतणवुकीची आर्थिक शिस्त आणि योग्य गुंतवणूक पर्याय तुम्हाला मोठा निधी जमा करण्यास मदत करेल.

गेल्या ५ महिन्यात शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. त्जज्ञांच्या मते जेव्हा शेअर बाजार कोसळतो, तेव्हाच गुंतवणुकीची उत्तम संधी असते. यातही तुम्हाला जोखीम कमी करायची असेल तर तुम्ही थेट शेअरमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता.

दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवून एसआयपी केल्यास जोखीम कमी होऊन उत्तम परतावा मिळेल. यासाठी खूप मोठी गुंतवणूक करावी असेही काही नाही. तुम्ही अगदी २५० रुपयांच्या एसआयपीद्वारे १७ लाख रुपयांचा निधी जमा करू शकता.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने ३० वर्षांच्या कालावधीसाठी २५० रुपयांची मासिक एसआयपी केली. तर या ३० वर्षात तुमची गुंतवणूक १,८०,००० रुपये होईल. यावर जर सरासरी १५% वार्षिक परतावा मिळत असेल, तर त्याला मॅच्युरिटीवर सुमारे १६,१२,०० रुपये मिळतील.

ही गुंतवणूक अशीच चालू ठेवली तर ही रक्कम आणखी वाढेल. मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की दीर्घकाळासाठी एसआयपी केवळ बाजारातील जोखीम कमी करत नाही तर उत्कृष्ट परतावा देखील देते.

सध्या २५० रुपयांची बचत करणे ही फार मोठी गोष्ट नाही. गुंतवणूकदाराने फक्त शिस्तबद्ध राहण्याची गरज आहे. त्यामुळे प्रतीक्षा न करता, प्रत्येक लहान गुंतवणूकदाराने किमान २५० रुपयांची एसआयपी करायला हरकत नाही.

(Disclaimer- यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)