Investment Tips for Women : महिलांना जबरदस्त नफा कमावून देऊ शकतात 'या' स्कीम्स; गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 12:04 IST2025-01-03T11:50:22+5:302025-01-03T12:04:27+5:30

2025 Investment Options for Women: महिला नोकरी करत असो वा नसो, बचतीची सवय प्रत्येकांमध्ये दिसून येते. पण ही बचत कुठेतरी गुंतवली तर तुम्ही स्वत:साठी भरपूर पैसे जोडू शकतात. २०२५

2025 Investment Options for Women: महिला नोकरी करत असो वा नसो, बचतीची सवय प्रत्येकांमध्ये दिसून येते. पण ही बचत कुठेतरी गुंतवली तर तुम्ही स्वत:साठी भरपूर पैसे जोडू शकतात. २०२५ हे नवं वर्ष आता सुरू झालंय. याच निमित्तानं महिलांसाठी गुंतवणुकीचे कोणते पर्याय चांगले असू शकतात हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

सोन्यात गुंतवणूक - वर्षानुवर्ष महिला सोन्यात गुंतवणूक करत आल्या आहेत. गेल्या काही वर्षांत सोन्याचे भाव ज्या प्रकारे वाढले आहेत, त्यावरून येत्या काळात सोनं खूप चांगला परतावा देऊ शकते, असा विचार करता येईल. आजच्या काळात तुम्ही फक्त फिजिकल गोल्डमध्येच गुंतवणूक करावी असं नाही, डिजिटल गोल्ड आणि गोल्ड ईटीएफ अशा अनेक पर्यायांच्या माध्यमातून गुंतवणूक करून तुम्ही नफा कमावू शकता. डिजिटल गोल्डमध्ये तुम्ही थोड्या रकमेतून गुंतवणूक सुरू करू शकता.

म्युच्युअल फंड एसआयपी - तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात पैसे गुंतवू शकता. या योजनेत तुम्ही फक्त ५०० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता आणि त्यासाठी कमाल मर्यादा नाही. एसआयपी ही मार्केट लिंक्ड स्कीम असूनही खूप चांगला परतावा देते. जर तुम्हाला दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही या योजनेच्या माध्यमातून सहज संपत्ती निर्मिती करू शकता. कारण या योजनेचा सरासरी परतावा १२% मानला जातो. असा परतावा इतर कोणत्याही योजनेत मिळत नाही.

महिला सन्मान बचत योजना - जर तुमच्याकडे एकरकमी पैसे असतील आणि ते फार काळ कुठेही गुंतवू इच्छित नसाल तर तुम्ही महिला सन्मान बचत योजनेत गुंतवणूक करू शकता. ही योजना विशेषतः महिलांसाठी आहे. यामध्ये तुमची रक्कम २ वर्षांसाठी जमा केली जाते. ७.५ टक्के दरानं व्याज दिलं जातं.

डेट फंड - डेट फंड हे खरं तर म्युच्युअल फंड असतात, जे खूप कमी जोखीम असलेल्या एफडीपेक्षा जास्त परतावा देतात. डेट फंडांमध्ये गुंतवणूकदारांकडून घेतलेले पैसे रोखे, सरकारी सिक्युरिटीज, ट्रेझरी बिल आणि नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर इत्यादी फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीजमध्ये गुंतवले जातात. म्हणजेच डेट फंडाचे पैसे सुरक्षित ठिकाणी गुंतवले जातात. इक्विटीपेक्षा डेट फंड अधिक सुरक्षित मानले जातात. यामध्ये लिक्विडिटीचीही समस्या नाही. म्हणजेच तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही तुमचे पैसे काढू शकता. साधारणपणे डेट फंडांची मॅच्युरिटी डेट ठरलेली असते. डेट फंडात तुम्हाला एफडीपेक्षा चांगला परतावा मिळू शकतो.

एलआयसी - आपण स्वत: साठी एलआयसी पॉलिसी देखील खरेदी करू शकता. एलआयसीमध्ये अशा अनेक योजना आहेत ज्या विशेषत: महिलांसाठी चालवल्या जातात. सर्वसाधारणपणे एलआयसी पॉलिसीची मुदत ८ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असते. अशावेळी तुम्ही ही पॉलिसी खरेदी करून दीर्घकालीन योजना आखू शकता आणि तुमचं भविष्य सुरक्षित करू शकता.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)