LIC IPO मध्ये गुंतवणूक करताना मिळणार ३ पर्याय; अवघ्या ३० सेकंदात जाणून घ्या कसा कराल अर्ज? By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 03:43 PM 2022-05-02T15:43:30+5:30 2022-05-02T15:47:50+5:30
शेअर बाजारातील आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. LIC IPO मध्ये कशी गुंतवणूक कराल? जाणून घ्या... भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (LIC) आयपीओ ४ मे रोजी खुला होणार आहे. या आयपीओमध्ये रिटेल गुंतवणूकदार ९ मेपर्यंत गुंतवणूक करू शकणार आहेत. या आयपीओमध्ये गुंतणूकदार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतील अशी सरकारला अपेक्षा आहे. यात बहुतांश गुंतवणूक पहिल्यांदाच एखाद्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे म्हणजे नवखे असणार आहेत. LIC IPO ची बेस प्राइज बँड ९०२ रुपयांपासून ९४९ रुपये ठेवण्यात आली आहे.
एलआयसीच्या आयपीओला अर्ज दाखल करताना गुंतवणूकदारांना पर्याय निवडताना अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. विशेषत: जे लोक पहिल्यांदाच एकाद्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणार आहेत अशांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कारण या आयपीओमध्ये गुंतवणूकदार म्हणून तुम्हाली तीन पर्याय असणार आहेत. त्यातील एक पर्याय निवडावा लागणार आहे.
LIC IPO मध्ये गुंतवणुकीचे पर्याय एलआयसीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची सोपी पद्धत आपण जाणून घेऊयात. ज्यात तुम्ही केवळ ३० सेकंदात तुमचा योग्य पर्याय निवडू शकता. कोणत्याही प्रकारच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमचं डिमॅट अकाऊंट असणं बंधनकारक आहे.
जेव्हा तुम्ही कोणत्याही ब्रोकरेज हाऊसच्या डिमॅट अकाऊंटमधून LIC च्या IPO साठी अप्लाय कराल तेव्हा गुंतवणूकदार कॅटेगरीमध्ये तीन पर्याय दिसून येतील. यात 1. New, 2. Policyholder, 3. Employee असं तीन पर्याय असतील.
पहिला पर्याय जर तुमच्याकडे एलआयसीची पॉलीसी आहे. म्हणजेच तुम्ही LIC पॉलिसीधारक आहात. तर तुम्हाला Policyholder पर्याय निवडावा लागेल. या कॅटेगरीची निवड केल्यानंतर तुम्हाला एलआयसीच्या आयपीओमध्ये १० टक्के आरक्षण प्राप्त होईल. याशिवाय पॉलिसी धारकांसाठी आयपीओमध्ये प्रति शेअर ६० रुपयांचा डिस्काऊंट देखील देण्यात आला आहे. जर तुम्ही पॉलिसीधारक कोट्यातून अप्लाय करत आहात तुम्हाला अपर प्राइस बँडच्या हिशोबानुसार किमान (९४९-६०= ८८९x१५= 13,335 रुपये) एकूण १३ हजार ३३५ रुपये गुंतवावे लागणार आहेत.
दुसरा पर्याय तुम्ही जर एलआयसीचे कर्मचारी आहात तर तुम्हाला Employee पर्याय निवडावा लागेल. एलआयसी कर्मचाऱ्यांना या आयपीओमध्ये अप्लाय केल्यानंतर प्रति शेअर ४५ रुपयांची सूट मिळणार आहे. अपर प्राइज बँडनुसार त्यांना एका लॉटच्या अर्जासाठी १३,५६० रुपये गुंतवावे लागणार आहेत.
तिसरा पर्याय तुमच्याकडे जर एलआयसीची पॉलिसी नाही किंवा तुम्ही एलआयसीची कर्मचारी देखील नाही. मग तुम्हाला सामान्य कॅटेगरीची निवड करावी लागेल. म्हणजेच तुम्ही New हा पर्याय निवडून अर्ज करू शकता. यात शेअरच्या एका लॉटसाठी तुम्हाला १४,२३५ रुपये मोजावे लागतील.
एलआयसी आयपीओच्या माध्यमातून सरकार आपला ३.५ टक्क्यांचा हिस्सा विकण्याच्या तयारीत आहे. यातून २१ हजार कोटी रुपये जमविण्याचा सरकारचा मानस आहे. यापद्धतीनं एलआयसीचा आयपीओ आजवरच्या भारतीय शेअर मार्केटच्या इतिसाहासातील सर्वात मोठा आयपीओ ठरण्याची शक्यता आहे. सरकारनं आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये निर्गंतवणुकीतून ६४ हजार कोटी रुपये जमविण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.