3 Tricks to Increase Salary; How to increase your salary in company
पगार वाढवण्याच्या ३ ट्रिक्स; पहिल्या २ कामी न आल्यास तिसरीने होईल भक्कम वाढ By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 05:01 PM2023-08-17T17:01:07+5:302023-08-17T17:05:16+5:30Join usJoin usNext महागाईच्या या स्पर्धेत प्रत्येकाला त्याचा पगार इतका वाढलेला हवा ज्यातून तो आरामदायी आयुष्य आणि बचत एकसाथ करू शकतो. सध्या महागाई प्रचंड वाढलीय आणि लोकांना त्यांचे दैनंदिन जीवन जगताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशावेळी सॅलरी इंक्रिमेंटवर सगळ्यांचा फोकस असतो. भारतात बहुतांश लोक खासगी नोकरी करतात. त्यांचा उत्पन्नाचा स्त्रोत्र मुख्यत: पगार आहे. योग्यतेनुसार कर्मचाऱ्यांना जॉबमध्ये इंक्रिमेंट हवा असतो. आर्थिक सल्लागारानुसार, देशातील महागाई दराच्या तुलनेत सॅलरीत वाढ व्हायला हवी त्यातून सुखकर जीवन जगता येईल. भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटल्याप्रमाणे देशात दरवर्षी ७ ते ८ टक्क्यांच्या हिशोबाने महागाईत वाढ होतेय. अशावेळी सॅलरीत वाढ त्यापेक्षा अधिक व्हायला हवी तेव्हाच लोक महागाईशी सामना करत जीवन जगू शकतात. देशात बहुतांश खासगी कंपन्या दरवर्षी महागाई दराहून जास्त सॅलरीत वाढ करतात जेणेकरून कर्मचाऱ्यांचे आर्थिक नियोजन योग्य राहील. परंतु जर कर्मचाऱ्यांच्या सॅलरीत मनासारखी वाढ होत नसेल तर काय करावं? अनेकजण जितकी सॅलरी मिळते त्यात खुश नसल्याचे म्हणतात. परंतु सॅलरी वाढण्याची जबाबदारी कंपन्यांची नसते तर कर्मचाऱ्यांनीही आपल्या स्तरावर प्रयत्न करायला हवेत. जर कुठल्या कर्मचाऱ्याच्या सॅलरीत अनेक वर्ष चांगली वाढ झाली नाही, त्याचा खर्च सातत्याने वाढत राहिला तर अशावेळी त्याने काय करायला हवे? जेणेकरून त्याची सॅलरी वाढेल. आज आम्ही तुम्हाला ३ उपाय सांगणार आहोत. ज्यातून तुमची सॅलरी वाढू शकते. जर तुम्हाला सॅलरीत चांगली ग्रोथ हवी असेल तर या ३ ट्रिक्स फॉलो करा. पहिली ट्रिक्स – ज्या संस्थेत तुम्ही काम करता तिथल्या सॅलरी स्ट्रक्चरबद्दल माहिती करून घ्या. कुठलीही कंपनी कर्मचाऱ्यांच्या गरजेनुसार सॅलरी वाढवत नाही. जर तुमची सॅलरी कमी असेल तर तुम्ही तुमच्या बॉसशी बोला. बॉसशी बोलताना काही फॅक्ट्स तुमच्याकडे असायला हवी. जसं तुमची सॅलरी कमी कशी, त्यात वाढ का व्हायला हवी. जे काम तुम्ही करता त्याची यादी तुम्ही बॉसला सांगा, ज्यात डेली वर्कचा समावेश नसेल. त्याशिवाय कंपनीसाठी तुम्ही किती महत्त्वाचे आहात त्याचा उल्लेख करा. जर बॉसने पगार वाढवण्यास नकार दिला तर इथेच चर्चा थांबली असं वाटू नये. तुम्ही कुठल्या मुद्द्यांवर फेरविचार करू शकता असं बॉसला विचारा. कधीही बॉससमोर दुसऱ्या कर्मचाऱ्यासोबत स्वत:ची तुलना करू नका. तुमची सॅलरी वाढायला हवी यावर फोकस करा. तुमची क्षमता दाखवण्यासाठी तुमच्यामुळे कंपनीला काय फायदा झाला ते सांगा. दुसरी ट्रिक्स – तुम्ही जे काम करता त्याची इंडस्ट्रित किती मागणी आहे. त्यावर विचार करा. जर तुम्हाला या फिल्डमध्ये पैसा मिळत नसेल तर तुम्ही फिल्ड बदलण्याचा विचार करू शकता. प्रत्येकाला आपापल्या क्षेत्रात कुठल्या लोकांची गरज आहे हे कळते. नवीन स्किल विकसित करा. हे सर्व तुम्ही जॉबवर असताना करू शकता. कामाव्यतिरिक्त अन्य ज्ञान घ्या, त्याचा फायदा कंपनीला होतोय हे प्रखरतेने दाखवून द्या. दुसऱ्या ठिकाणची ऑफरही तुम्हाला मिळेल. तिसरी ट्रिक्स – जर तुम्ही बराच काळ एकाच कंपनीत राहिला असाल आणि तुमचा पगार महागाई दराच्या तुलनेने वाढत नसेल तर तुम्ही कुठलाही विचार न करता जॉब बदला. अनेकदा जॉब बदलून तुम्हाला नवीन भूमिका मिळते. त्याशिवाय कामाची पद्धत बदलते. नव्या कंपनीत नवीन गोष्टी शिकायला मिळतात. परंतु नोकरी बदलण्यापूर्वी रिसर्च करा, तुमचा अनुभव, शिक्षण आणि काम याआधारे नवीन कंपनीत किती सॅलरी असायला हवी. जर तुम्हाला सध्याच्या कंपनीपेक्षा चांगली ऑफर मिळत असेल तर नोकरी बदलणे वाईट नाही. अनेकदा लोक त्याच त्याच कंपनीत राहून पगाराशी तडजोड करतात. परंतु त्यामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यांना खूप तोटा सहन करावा लागतो. टॅग्स :कर्मचारीEmployee