जगातील टॉप 10 आयटी कंपन्यात 4 भारतीय, टाटाचा दुसरा नंबर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 15:55 IST2022-02-04T15:47:31+5:302022-02-04T15:55:08+5:30
लंडनमधली ब्रँड फायनान्स ही ख्यातनाम कंपनी ब्रँड व्हॅल्यूचे मोजमाप करून वार्षिक यादी प्रसिद्ध करीत असते.

सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असलेल्या पहिल्या दहा आयटी कंपन्यांमध्ये अक्सेंजर कंपनी पहिल्या स्थानावर असून टाटांच्या टीसीएसला दुसरे स्थान मिळाले आहे.
जगभरातील सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असलेल्या पहिल्या दहा इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी कंपन्यांमध्ये चार भारतीय कंपन्या आहेत.
लंडनमधली ब्रँड फायनान्स ही ख्यातनाम कंपनी ब्रँड व्हॅल्यूचे मोजमाप करून वार्षिक यादी प्रसिद्ध करीत असते.
२०२१ साठीच्या पहिल्या दहा आयटी कंपन्यांमध्ये अक्सेंचर या अमेरिकन कंपनीने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.
१६.८ बिलियन अमेरिकन डॉलर्स अशी तगडी ब्रँड व्हॅल्यू असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
१२.८ बिलियन डॉलर्स अशी ब्रँड व्हॅल्यू असलेली इन्फोसिस तिसऱ्या स्थानी आहे.
विप्रो आणि एचसीएल या दोन भारतीय कंपन्यांनी अनुक्रमे सातवे आणि आठवे स्थान पटकावले आहे.
HCL ही कंपनी आठव्या स्थानावर आहे
NTT data ही कंपनी या सर्वेक्षणात नवव्या स्थानावर आहे
Fujitsu ही कंपनी 10 व्या स्थानावर आहे