4k salary job to owner of a multi-crore company; Read Success story of Dadasaheb Bhagat
यशोगाथा! ४ हजाराची नोकरी ते कोट्यवधी कंपनीचा मालक; एकेकाळी टॉयलेटही साफ केलं By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 12:27 PM2023-10-07T12:27:01+5:302023-10-07T12:36:14+5:30Join usJoin usNext ब्राझिलियन लेखक पाउलो कुएलो यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे, ज्याचं मराठीत भाषांतर असं की, "जर तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून हवी असते तेव्हा संपूर्ण जग ती गोष्ट तुम्हाला ळविण्यात मदत करू लागते. बॉलीवूड चित्रपटातही तुम्ही असाच संवाद ऐकला असेल. महाराष्ट्रातील दादासाहेब भगत यांची कहाणी अगदी या वाक्याला अगदी तंतोतंत बसते. दादासाहेब भगत हे ग्राफिक डिझाईन कंपनीचे मालक आहेत. ही कंपनी २ कोटी रुपयांची उलाढाल करत असून यावर्षी ती १० कोटी रुपयांपर्यंत वाढेल अशी आशा आहे. महाराष्ट्रातील अतिशय दुर्गम भागातून दादासाहेब भगत पुढे आले आहेत. त्यांच्या घरातील सर्व लोक ६ महिने ऊस तोडणीसाठी दुसऱ्या गावी जात असत. गरोदर असताना त्याच्या आईने डोक्यावर उसाचा गठ्ठा उचलला होता असं त्यांनी म्हटलं. बारावीपर्यंत शिकलेल्या दादासाहेबांनी वडिलांसोबत गावात विहिरी खोदल्या, त्यासाठी त्यांना १०० रुपयेही हजेरी मिळाली नाही. घर बांधकामातही त्यांनी मजुरी केली आज तेच दादासाहेब दोन कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक असून अनेकांना रोजगार देत आहेत. दादासाहेबांनी कशीतरी बारावी पूर्ण केली आणि त्यानंतर डिप्लोमा कोर्सला प्रवेश घेतला. तेथून ४००० रुपयांना टाटामध्ये नोकरी लागली. टाटामध्ये काम करत असताना त्यांना कोणीतरी इन्फोसिसमध्ये ९००० रुपये मिळतील, पण ऑफिस बॉय म्हणून काम करावे लागेल असं सांगितले. पैशाची गरज असल्याने दादासाहेबांनी ही नोकरी पत्करली. झाडू मारण्याबरोबरच त्यांना तेथील टॉयलेटही स्वच्छ करावी लागली. इथे काम करताना त्यांना जर तू ग्राफिक डिझायनिंग शिकला तर त्याला चांगले पैसे मिळू शकतात आणि त्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नाही असं एकानं म्हटलं. इन्फोसिसमध्ये येण्यापूर्वी दादासाहेबांनी कधी संगणकही पाहिला नव्हता. परंतु त्या व्यक्तीच्या सल्ल्याने त्यांनी ग्राफिक डिझायनिंग शिकून ऑफिस बॉय म्हणून नोकरी सोडून एका ग्राफिक्स कंपनीत काम करू लागले. यावेळी VFX आणि मोशन ग्राफिक्स सारख्या इतर ग्राफिक्सशी संबंधित काम देखील दादासाहेब शिकले. सुमारे ३-४ वर्षे येथे काम केल्यानंतर २०१५ च्या सुमारास दादासाहेबांचा अपघात झाला आणि त्यांना घरी परतावे लागले. मग त्यांनी मित्राकडून लॅपटॉप घेतला अन् घरबसल्या टेम्प्लेट बनवून त्याची ऑनलाइन विक्री सुरू केली. काही महिन्यांनी त्यांना त्यांच्या पगारापेक्षा जास्त पैसे मिळू लागले. त्यानंतर त्यांनी स्वतःची कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. दादासाहेबांची कंपनी आज ग्राफिक टेम्प्लेट्स बनवून लोकांना पुरवते. कंपनी मोशन ग्राफिक्स आणि 3D टेम्पलेट्स देखील तयार करते. त्यांचे फक्त देशातच नव्हे तर बहुतेक ग्राहक परदेशीही आहेत. अनेक मोठ्या कंपन्या त्यांच्या उत्पादनांचं डिझाईन बनवून घेतात. त्यांची कंपनी कॅनव्हा मॉडेलवर काम करते आज दादासाहेबांची स्वतःची ऑडी आहे. त्यांची डिझाईन टेम्प्लेट्समधील कंपनीत २५-३० लोकांचा स्टाफ आहे. २ कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेली ही कंपनी यावर्षी १० उलाढाल कोटी रुपये होईल असा विश्वास दादासाहेबांनी व्यक्त केला. टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीInspirational Stories