EMI भरण्याचं टेन्शन सोडा; 'या' ५ टीप्स गृहकर्जाचे हप्ते झटक्यात करतील कमी By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 03:03 PM 2024-12-04T15:03:52+5:30 2024-12-04T15:06:31+5:30
home loan emi : आरबीआयची चलनविषयक धोरण बैठक ४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या बैठकीत रेपो दराबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. रेपो दर वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा परिणाम सामान्यांच्या खिशावरही होतो. रेपो दर कमी झाला की कर्जे स्वस्त होतात आणि रेपो दर वाढला की कर्जे महाग होतात. आरबीआय काय निर्णय घेईल कोणीही सांगू शकत नाही. पण, तुम्ही मात्र तुमच्या कर्जाचं ओझे नक्कीच हलकं करू शकता. यासाठी फक्त ५ टिप्स फॉलो कराव्या लागतील. जर तुमचे गृहकर्जाचे व्याजदर जास्त असेल. तर तुम्ही कर्जाचे पुनर्वित्त मिळवू शकता. कर्ज पुनर्वित्तीकरणामध्ये, कमी व्याजदरात काही अटींसह नवीन कर्ज घेता येते. यात तुमच्या ईएमआयचा हप्ता नक्कीच कमी होईल.
तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय, जर तुम्हाला बोनस किंवा नफाच्या स्वरुपात अचानाक धनलाभ झाला. तर ह्या रकमेत मौजमजा करण्यापेक्षा कर्जाचे पूर्वपेमेंट करण्यासाठी वापरा. कर्जाच्या प्रीपेमेंटने, तुमची मूळ रक्कम कमी होईल. परिणामी EMI कमी भरावा लागेल.
जर तुमचा EMI खूप जास्त असेल आणि त्यामुळे तुमचे घराचे बजेट विस्कळीत होत असेल तर तुम्ही तुमच्या कर्जाची मुदत वाढवू शकता. मुदत वाढवल्याने तुमचा EMI कमी होईल. पण, यामुळे कर्जावरील एकूण व्याज वाढते, हे लक्षात ठेवा.
जर तुम्ही बऱ्याच काळापासून कर्जाची वेळेवर परतफेड करत असाल. तर तुम्ही तुमच्या बँकेला व्याजदर कमी करण्याची विनंती करू शकता. काही वेळा बँका त्यांच्या जुन्या ग्राहकांना कमी व्याजदराचा लाभ देतात.
तुम्ही पहिल्यांदाच घर खरेदी करत असाल, तर प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) सारख्या सरकारी योजनांचा लाभ घ्या. या योजनेअंतर्गत व्याजदरात सबसिडी मिळते. याशिवाय कर्ज घेताना अधिक डाउन पेमेंट करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचा ईएमआय सुरुवातीपासून इतका कमी असेल की तुम्ही सहज पेमेंट करू शकता.