Rent Agreement : तुमच्या भाडे करारामध्ये 'या' ५ गोष्टी नक्की पहा; कधीही फायद्यात रहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 03:22 PM2024-10-23T15:22:09+5:302024-10-23T15:26:49+5:30

Rent Agreement : तुम्ही स्वतः घरमालक असाल किंवा भाडेकरू, भाडे करार करणे खूप आवश्यक आहे. अनेकदा पैसे वाचवण्यासाठी किंवा कंटाळा म्हणून आपण याकडे दुर्लक्ष करू शकतो. मात्र, एक चूक भविष्यात दोघांनाही महागात पडू शकते.

भाडे करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी तुम्ही काही गोष्टी तपासून पाहिल्या पाहिजेत. भाडेकरू आणि घरमालक या दोघांच्या दृष्टीने या महत्त्वाच्या आहेत.

किती काळानंतर भाडेवाढ होणार याचा स्पष्ट उल्लेख भाडे करारात असावा. मग तो दीर्घकालीन (चार वर्षे ते पाच वर्षे) करार असेल किंवा अल्प-मुदतीचा (11 महिने) करार असेल. भाडे कोणत्या दराने वाढणार हेही यात स्पष्ट हवे.

भाडे करारात नोटीस कालावधी नमूद करणे आवश्यक आहे. कारण, अनेकदा मालक किंवा भाडेकरुनवर भाडे करार रद्द करण्याची वेळ येऊ शकते.

भाडेकरू इतर कोणालाही घर भाड्याने देऊ शकत नाही. अनेक ठिकाणी घरमालक पाळीव प्राणी ठेवण्याची किंवा सोसायटीमध्ये पार्किंगची सुविधा देत नाहीत. या सर्व गोष्टींवर आधी चर्चा करा.

बहुतेक भाडे करार फुली फर्निश्‍ड किंवा सेमी-फर्निश्‍ड घरांसाठी असतात. अशा परिस्थितीत, करारामध्ये फर्निचर आणि फिटिंगची संपूर्ण यादी असणे आवश्यक आहे.