२०१४ मध्ये ५५ लाख कोटी ते आज २०५; तुम्ही देशाचे किती रुपये कर्ज देणे लागता? By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 12:19 PM 2023-12-23T12:19:18+5:30 2023-12-23T12:25:37+5:30
India debt 2014 to 2023: वाढत्या कर्जावरून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) इशारा दिला आहे. अशाच प्रकारे सरकार उधारी घेत राहिल्यास जीडीपीच्या १०० टक्के कर्ज होण्याचा धोका आहे. भारताने मात्र आयएमएफचा दावा फेटाळला आहे. नवी दिल्ली : भारतावरील एकूण कर्ज सप्टेंबरच्या तिमाहीत वाढून २०५ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागील वित्त वर्षाच्या शेवटच्या म्हणजेच मार्चच्या तिमाहीत देशाचे एकूण कर्ज २०० लाख कोटी रुपये होते.
वाढत्या कर्जावरून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) इशारा दिला आहे. अशाच प्रकारे सरकार उधारी घेत राहिल्यास जीडीपीच्या १०० टक्के कर्ज होण्याचा धोका आहे. भारताने मात्र आयएमएफचा दावा फेटाळला आहे.
५ लाख कोटी रुपये कर्ज गेल्या सहा महिन्यांत वाढले आहे. १५५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज केंद्र सरकारवर मार्च २०२३ मध्ये होते. १६१ लाख कोटी रुपये केंद्र सरकारवरील कर्ज सप्टेंबर २०२३ मध्ये पोहोचले.
भारत सरकारवर २००४ मध्ये १७ लाख कोटी रुपये कर्ज होते. ५५ लाख कोटी रुपये कर्ज २०१४ मध्ये झाले. तीन पट वाढ या कालावधीत झाली.
विदेशी कर्ज किती? ५०लाख कोटी रुपये विदेशी कर्ज २०२३-२४ आर्थिक वर्षात झाले आहे. ३१लाख कोटी रुपये विदेश कर्ज २०१४-१५ या आर्थिक वर्षात होते.
देशाच्या प्रत्येक नागरिकावर किती कर्ज? २०५ लाख कोटी रुपये देशावर एकूण कर्ज सध्या आहे. १४२ लाख कोटी रुपये लोकसंख्या गृहीत धरल्यास जवळपास १.४० लाख रुपयांचे कर्ज प्रत्येक नागरिकावर आहे. १९२% कर्ज गेल्या ९ वर्षांत वाढले आहे.