अर्थसंकल्पानंतर सरकारी कर्मचारी होणार मालामाल! ९० हजार रुपयांनी वेतनात होणार वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 12:03 PM2023-01-18T12:03:23+5:302023-01-18T12:17:32+5:30

२०२३-२४ या वर्षाचे अर्थसंकल्प काही दिवसातच जाहीर होणार आहे. या टर्ममधील मोदी सरकारचे हे बजेट शेवटचे असणार आहे.

२०२३-२४ या वर्षाचे अर्थसंकल्प काही दिवसातच जाहीर होणार आहे. या टर्ममधील मोदी सरकारचे हे बजेट शेवटचे असणार आहे, त्यामुळे या बजेटकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे.

या बजेटमध्ये सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळू शकतो असं बोलले जात आहे. इंधन, गॅस दरांमधून सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो.

काही अहवालानुसार, या बजेटमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठं गिफ्ट मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचे फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची अपेक्षा आहे. पण केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीए वाढीची घोषणा मार्चमध्ये होणार आहे.

एक कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना या डीए वाढीचा लाभ मिळणार आहे.

मार्चमधील महागाई भत्त्याची घोषणा १ जानेवारीपासून लागू होईल. जानेवारीअखेरीस येणाऱ्या डिसेंबरच्या AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होईल. यावेळी DA किती वाढणार आहे? जुलै 2022 मधील वाढीच्या आधारे केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38% महागाई भत्ता मिळत आहे. आगामी काळात हा आकडा 41% पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.

या वर्षी डीएमध्ये किमान 3 टक्के वाढ निश्चित असल्याचे मानले जात आहे. कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी असेल. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 25000 रुपये असेल, तर 3 टक्क्यांनुसार त्याचा पगार दरमहा 750 रुपयांनी वाढेल. त्यांचा एकूण पगार वार्षिक आधारावर 9000 रुपयांनी वाढेल.

कॅबिनेट सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांच्या पगारात दरमहा 7,500 रुपयांनी म्हणजेच वार्षिक 90,000 रुपयांची वाढ अपेक्षित आहे.

कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी महागाई भत्ता दिला जातो. त्याची गणना कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनाच्या आधारावर केली जाते.