'या' 8 दग्गजांनी आपल्याच कंपनीला सोडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 03:42 PM2019-11-13T15:42:38+5:302019-11-13T15:47:54+5:30

चीनच्या अलिबाबा या ई-कॉमर्स कंपनीचे संस्थापक आणि चेअरमन जॅक मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. शिक्षण क्षेत्रात स्वत:ला झोकून देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता.

मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनीही कंपनीच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला होता.

ब्लॅकबेरी बनविणाऱ्या रिसर्च अँड मोशन कंपनीचे चेअरमन माइक लजारिडीस यांनी 2013 मध्ये निवृत्ती घेतली होती.

सोशल गेमिंग कंपनी जिंगाचे संस्थापक मार्क पिंकस यांनी 2014 मध्ये आपल्या कंपनीपासून स्वत:ला वेगळं केलं. केवळ नॉन एक्झिक्युटीव्ह चेअरमनपदी ते राहिले.

डोर्सीच्या मॅनेजमेंट स्टाईलने नाराज होऊन ट्विटरच्या बोर्ड मंडळाने मायक्रो ब्लॉगिंग साईटचे संस्थापक जैस डोर्सी यांना पदावरुन पायउतार होण्याचे सांगितले होते.

सन 2014 मध्ये मोझिला कंपनीच्या सीईओ पदावरुन इच यांनी राजीनामा दिला होता.

उबर या कॅबसेवा देणाऱ्या कंपनीचे प्रमुख ट्राविस कालानिक यांनी कंपनीतील वादामुळे 2017 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

सन 1985 मध्ये अॅपल कंपनीचे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांना कंपनीतील वादामुळे सीईओ पदावरुन हटविण्यात आले होते.