912 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, मोफत Hotstar सबस्क्रिप्शन अन्..; Jio चा दमदार प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 21:44 IST2025-03-28T21:40:14+5:302025-03-28T21:44:34+5:30
पुन्हा-पुन्हा रिचार्जची चिंता सोडा, आता 365 दिवस Jio सिम ॲक्टिव्ह राहणार.

भारतातील सुमारे 46 कोटी मोबाईल युजर्स रिलायन्स Jio सिम वापरतात. आपल्या करोडो ग्राहकांसाठी कंपनी वेळोवेळी नवीन रिचार्ज प्लॅन्स आणत असते. तुम्ही Jio युजर असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता कंपनीने आपल्या युजर्ससाठी दीर्घ वैधतेचा प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये तुम्ही 365 दिवस आपले सिम कार्ड ॲक्टिव्ह ठेवू शकता.
गेल्या काही काळापासून Jio युजर्समध्ये दीर्घ वैधता असलेल्या रिचार्ज प्लॅन्सची मागणी वेगाने वाढली आहे. हीच गरज लक्षात घेऊन कंपनीने आपल्या पोर्टफोलिओमध्ये दीर्घ वैधता असलेल्या प्लॅन्सची संख्या वाढवली आहे. जिओकडे 90 दिवस, 98 दिवस, 72 दिवस आणि 365 दिवसांच्या वैधतेसह अनेक प्लॅन्स आहेत.
रिलायन्स जिओने आपल्या रिचार्ज प्लॅन्सचा पोर्टफोलिओ वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागला आहे. वार्षिक योजनांसाठीदेखील एक विभाग आहे, ज्यामध्ये दोन रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत. तुम्हाला सर्वात कमी किमतीत जिओ सिम 365 दिवस ॲक्टिव्ह ठेवायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला 3599 रुपयांचा प्लॅन घ्यावा लागेल. यात अनेक उत्तम ऑफर्स मिळतात.
यामध्ये कंपनी सर्व स्थानिक आणि STD नेटवर्कसाठी अमर्यादित कॉलिंगची ऑफर देत आहे. म्हणजे वर्षभर तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तींशी मोकळेपणाने बोलू शकता. या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 100 मोफत एसएमएसदेखील मिळतात.
जास्त इंटरनेट वापरणाऱ्या Jio युजर्ससाठी हा एक बंपर पॅक आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये कंपनी ग्राहकांना 365 दिवसांसाठी 912GB पेक्षा जास्त डेटा देत आहे. म्हणजेच, तुम्ही दररोज 2.5GB पर्यंत हाय स्पीड डेटा वापरू शकता.
हा प्लॅन ट्रू 5G ऑफरसह येतो, म्हणजेच तुम्हाला हायस्पीड इंटरनेट मिळते. डेली डेटा संपल्यानंतरही तुम्ही 64Kbps च्या स्पीडने ब्राउझिंग करू शकता.
या 365 दिवसांच्या वार्षिक प्लॅनमध्ये 90 दिवसांसाठी Jio Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते. यासोबतच ग्राहकांना Jio AI Cloud चे 50GB पर्यंत सबस्क्रिप्शन देखील मिळते. तुम्ही टीव्ही चॅनेल पाहत असाल तर यासाठी कंपनी ग्राहकांना जिओ टीव्हीचे मोफत सबस्क्रिप्शन देते.