प्रत्येक महिन्याला ३ हजारांची SIP, निवृत्तीनंतर दरमहा १.५ लाख देईल; जाणून घ्या गणित

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 12:33 PM2024-01-18T12:33:50+5:302024-01-18T12:45:52+5:30

सध्याच्या काळात गुंतवणूक ही एक महत्वाचे काम आहे.

सध्याच्या काळात गुंतवणूक करणे महत्वाचे आहे. अनेकजण शेअर बाजारात गुंतवणूक करतात. तर काहीजण शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास घाबरतात. पण, शेअर मार्केटचा तुम्हाला जास्त पायदा मिळवून देते.

तुम्हालाही शेअर बाजारात गुंतवणुकीचा फायदा घ्यायचा असेल पण शेअर्समध्ये गुंतवणूक टाळायची असेल, तर तुम्ही सिस्टमॅटीक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करु शकता. दीर्घ मुदतीसाठी पैसा उभारण्यासाठी ही गुंतवणूक योजना हा एक चांगला पर्याय आहे.

ज्यांना गुंतवणुकी करायची आहे पण शेअर बाजारातील चढ-उताराचा परिणाम न होता दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवायची आहे, त्यांच्यासाठी सिस्टमॅटीक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा एक उत्तम गुंतवणूक पर्याय आहे.

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हा फक्त कमाईचा पर्याय नाही तर तो तुमच्या भविष्यासाठी नियमित उत्पन्नाचा स्रोत देखील बनू शकतो. तुमचे वय २५ वर्षे असल्यास तुम्ही तुमच्या सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये ३००० रुपये प्रति महिना गुंतवणूक सुरू करू शकता.

पुढील ३५ वर्षांनी जेव्हा तुम्ही निवृत्त व्हाल, तेव्हा तुम्ही केवळ गुंतवणूकच करत नसाल तर निवृत्तीनंतरचे निश्चित उत्पन्न देखील तयार कराल.

वयाच्या २५ व्या वर्षी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे दरमहा ३००० रुपयांची गुंतवणूक केल्याने तुमचे पैसे वाढण्याची पूर्ण संधी मिळते.

तुमच्या गुंतवणुकीमध्ये चक्रवाढीचा फायदा होतो आणि तुम्ही निवृत्तीचे वय जवळ आल्यावर तुम्हाला निश्चित उत्पन्नाचा स्रोत देखील देतो.

जर तुम्ही दरमहा ३००० ची गुंतवणूक करायला सुरुवात केली, तर ३५व्या वर्षी, पाच टक्के वार्षिक वाढीसह, ती १५,७६० ची मासिक गुंतवणूक होईल.

याचा अर्थ असा की तुमच्या गुंतवणुकीच्या पहिल्या वर्षी तुम्ही SIP मध्ये ३६००० ची गुंतवणूक करता तर ३५ व्या वर्षी तुम्ही १.८९ लाख गुंतवणूक करता.

१२% सरासरी परताव्याच्या आधारावर विचार केला तर ३५ वर्षात तुम्ही ३२.५१ लाख रुपये गुंतवले आहेत आणि तुमची गुंतवणूक केलेली रक्कम २.९९ कोटी रुपये झाली आहे. होय, ३५ वर्षात तुम्ही सुमारे तीन कोटी रुपयांचे मालक झालेला असणार.

जर तुम्ही तुमच्या सेवानिवृत्ती निधीमध्ये ३ कोटी रुपये ठेवले, तर दर वर्षी ६% च्या फिक्स डिपॉझिट दरानेही तुम्हाला दरमहा १.५ लाख रुपये मिळतील.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)