अदानी समुहासाठी आनंदाची बातमी! अदानींनी केले कमबॅक, रेटिंग एजन्सीने दिली महत्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 09:49 AM2023-02-08T09:49:49+5:302023-02-08T11:36:03+5:30

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहावर घोटाळ्याचे आरोप केले आहेत, या आरोपामुळे गेल्या काही दिवसापासून अदानी समुहाचे शेअर्स घसरले आहेत.

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहावर घोटाळ्याचे आरोप केले आहेत, या आरोपामुळे गेल्या काही दिवसापासून अदानी समुहाचे शेअर्स घसरले आहेत. या आरोपांमुळे उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत घट झाली आहे. पण, आता अदानी समुहाने पुन्हा कमबॅक करण्यास सुरुवात केली आहे. आता अदानी समुहाचे शेअर तेजीत असल्याचे पाहायला मिळत आहे. रेटिंग एजन्सींनीही अदानी समूहाबाबत पॉझिटिव्ह रिपोर्ट दिले आहेत.

अदानी समूहाच्या कर्जाबाबत मूडीज आणि फिच या दोन्ही कंपन्यांनी आपले अहवाल दिले आहेत. 'अदानी समूहाच्या कंपन्यांनी भारतीय बँकांकडून घेतलेली कर्जे त्यांच्या पत गुणवत्तेला कोणताही धोका निर्माण करण्याइतकी जास्त नाहीत, असं जगातील आघाडीच्या रेटिंग एजन्सी फिच आणि मूडीज यांनी मंगळवारी सांगितले, त्यामुळे आता अदानी समुहाने पुन्हा कमबॅक केले आहे.

रेटिंग एजन्सी फिच आणि मूडीज यांनी मंगळवारी अहवाल सादर केला आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांनी भारतीय बँकांकडून घेतलेली कर्जे त्यांच्या पत गुणवत्तेला कोणताही धोका निर्माण करण्याइतकी जास्त नाहीत, असं या अहवालात म्हटले आहे.

'गरज पडल्यास बँकांना असाधारण सरकारी मदतीची अपेक्षा लक्षात घेऊन बँक रेटिंग सेट केले जातात, असंही या अहवालात म्हटले आहे. अमेरिकन इन्व्हेस्टमेंट रिसर्च फर्म हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल समोर आल्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. त्यामुळे आता भारतीय बँकांनी अदानी समुहाला दिलेल्या कर्जावर शंका व्यक्त केली जात होती. पण, आता नवीन दोन अहवाल आले आहेत.

या अहवालात अदानी समूहाच्या कंपन्यांनी भारतीय बँकांकडून घेतलेली कर्जे त्यांच्या पत गुणवत्तेला कोणताही धोका निर्माण करण्याइतकी जास्त नाहीत, असं म्हटले आहे. यामुळे आता मंगळवारपासून पुन्हा अदानी समुहाच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाली आहे.' अदानी समूहाकडे भारतीय बँकांचे एक्सपोजर बँकांच्या क्रेडिट प्रोफाइलला कोणताही ठोस धोका निर्माण करण्याइतपत उच्च नाही, असं फिच रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

बुडीत कर्जाच्या बाबतीत गरज पडल्यास त्यांना असाधारण सरकारी मदत मिळेल या अपेक्षेवर बँकांचे रेटिंग आधारित आहे. 'अदानी समूहाचा बराचसा भाग तणावाखाली येत असल्याच्या काल्पनिक परिस्थितीतही, भारतीय बँकांची पत जोखीम आटोपशीर असेल आणि या बँकांच्या व्यवहार्यता रेटिंगवर कोणतेही प्रतिकूल परिणाम होणार नाहीत, असंही या अहवालात म्हटले आहे.

'अदानी समूहाशी संबंधित काही अघोषित नॉन-फंडेड कर्जे असू शकतात. पण, पतमानांकन एजन्सीने अशी धारणा वितरित कर्जापेक्षा कमी असणे अपेक्षित आहे. यासोबतच या वादाचा परिणाम व्यापक होऊन भारताच्या प्रतिष्ठेवर परिणाम होऊ शकतो, अशा धोक्याचा इशाराही फिचने दिला आहे.

क्रेडिट रेटिंग एजन्सी मूडीज इन्व्हेस्टर सर्व्हिसने अहवाल दिला आहे. या अहवालात सार्वजनिक क्षेत्रातील बँका अदानी समूहाला कर्ज देण्यात खासगी बँकांपेक्षा खूप पुढे आहेत, पण, बहुतेक बँकांच्या एकूण कर्ज वितरणात अदानी समूहाचा वाटा एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. भारतीय बँकांच्या कर्जाचा धोका कमी असला तरी सध्याच्या घडामोडींमुळे अदानी समूहाला आंतरराष्ट्रीय बाजारातून मिळणारा निधी कमी होऊ शकतो,असं मुडीजने म्हटले आहे.

'कर्जाचा मोठा भाग परदेशातून आला आहे. या संदर्भात मूडीजने म्हटले आहे की, अदानी समूह बँकांकडून घेतलेल्या कर्जावर अधिक अवलंबून राहिल्यास बँकांचा धोका वाढू शकतो.' भारतीय बँकांच्या कॉर्पोरेट्सची पत गुणवत्ता एकूणच स्थिर राहील, असं रेटिंग एजन्सीने म्हटले आहे.