adani group returns 27000 crore in investors and banks in just 4 days
अदानी वेळेआधीच सर्वांचं कर्ज का फेडताहेत? ४ दिवसात केलं काम तमाम! कारण... By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 12:27 PM2023-02-09T12:27:26+5:302023-02-09T12:36:55+5:30Join usJoin usNext हिंडेनबर्गच्या वादळातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी अदानी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. जेणेकरून कंपनीला बाजार आणि गुंतवणूकदारांचा विश्वास परत मिळवता येईल. अदानींनी वेळेपूर्वी पैसे परत केल्याचा परिणाम त्यांच्या शेअर्सवरही दिसू लागला आहे. गेल्या ४ दिवसांत अदानींनी गुंतवणूकदार, परदेशी बँका आणि देशांतर्गत बँकांचे पैसे परत करण्याच्या प्रक्रियेला गती दिली आहे. अदानी समूह आता शेअर बाजारात सावरताना दिसत असून कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळते आहे. २४ जानेवारी रोजी हिंडनबर्गचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी समूहातील सर्वच कंपन्यांच्या शेअर्सनं गटांगळी घेतली. या वादळाचा सामना करताना अदानी समूहाकडून सर्वप्रथम गुंतवणूकदारांना १८००० कोटी आगाऊ परत करण्याचे आश्वासन दिले. सकाळी दिलेलं वचन संध्याकाळी पूर्ण देखील केलं गेलं. अदानींच्या या निर्णयाने गुंतवणूकदारांचं नुकसान झाल नाही. सोबतच अदानींच्या शेअर्सनाही मोठा फटका टाळता आला. परदेशी बँकांच्याबाबतही अदानींनी मोठा निर्णय घेतला. अदानी यांनी शेअर गुंतवणूकदारांचे पैसे आगाऊ परत केल्यानंतर क्रेडिट सुइस, जेपी मॉर्गन, जेएम फायनान्शियल आणि काही म्युच्युअल फंड कंपन्यांच्या कर्जाची परतफेड करताना ७००० कोटी परत करण्याचे आश्वासन दिले. अदानींनी आता बार्कलेज पीएलसी, स्टँडर्ड चार्टर्ड पीएलसी आणि ड्यूश बँकेचे पैसे परत करण्याची नवी घोषणा केली. कंपनीने म्हटले आहे की, या बँकांना सुमारे ४१०० कोटींची रक्कम परत करणार आहे. अशाप्रकारे, अवघ्या ४ दिवसांत २७००० कोटींची रक्कम परत करण्याची तयारी दाखवून अदानी समूहाने शेअर बाजारातील आपण तगडे खेळाडू असल्याचं सिद्ध केलं. व्यवसायातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे विश्वासार्हता. जर तुमची विश्वासार्हता नष्ट झाली तर ती परत येऊ शकत नाही आणि अदानींना याची पूर्ण कल्पना आहे. आता अदानींच्या या निर्णयाचा बाजारातील शेअर्सवर किती परिणाम होतो हे पाहावं लागेल.ठाम उभी आहे कंपनी... गौतम अदानींनी गेल्या आठवड्यात एक व्हिडिओ जारी करत ग्रुपची बॅलन्सशीट खूप मजबूत असल्याचा विश्वास दिला होता. मंगळवारी अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरच्या किमतीत मोठी वाढ झाली. कंपनीने १ अब्ज डॉलर कर्ज प्रीपेमेंट केल्यामुळे स्टॉकच्या किमतीत १५% वाढ झाली.अदानी पुन्हा अव्वल फोर्ब्सच्या बुधवारच्या यादीत गौतम अदानी टॉप गेनर होते, या वेबसाइटने त्यांच्या संपत्तीच्या आधारे जगातील श्रीमंतांची रँकिंग केली होती. काल गौतम अदानी यांनी जगभरात सर्वाधिक कमाई केली. एका दिवसात त्यांच्या खात्यात सर्वाधिक संपत्ती जमा झाली. बुधवारी गौतम अदानी यांनी २४ तासांत ४.३ अब्ज डॉलरची कमाई केली. अदानींची एकूण संपत्ती आता ६४.९ अब्ज डॉलर इतकी झाली आहे. फोर्ब्सच्या सर्वाधिक गेनच्या यादीत अदानींनंतर इलॉन मस्क दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर Klaus-Michael Kuehne तिसऱ्या क्रमांकावर आहेत.टॅग्स :गौतम अदानीअदानीGautam AdaniAdani