Gold Silver Price Today : 'ऑल टाईम हाय'नंतर आज सोन्या-चांदीच्या घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 01:57 PM2024-10-15T13:57:51+5:302024-10-15T14:09:37+5:30

Gold Silver Price 15 October: आज सोन्या-चांदीच्या वाढत्या किमतींना ब्रेक लागला आहे. सोनं आज आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवरून घसरलं.

Gold Silver Price 15 October: आज सोन्या-चांदीच्या वाढत्या किमतींना ब्रेक लागला आहे. सोनं आज आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवरून घसरलं. मंगळवारी सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ५३६ रुपयांनी घसरून ७५४६५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. सोमवारी तो ७६,१३२ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता.

जीएसटीमुळे आता २४ कॅरेट सोन्याचा भाव ७७,७२८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. यामध्ये २२६३ रुपये जीएसटीशी संबंधित आहेत. दिल्लीतील सराफा बाजारात एक किलो चांदीचा भाव ४४८ रुपयांनी घसरून ९०,०२६ रुपये झालाय.

सोने आणि चांदीचे हे दर आयबीजेएनं जाहीर केले आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेसचा समावेश नाही. आपल्या शहरातील सोन्या-चांदीच्या दरात १००० ते २००० चा फरक असण्याची शक्यता आहे.

आज २३ कॅरेट सोन्याचा भाव ३१३ रुपयांनी घसरून ७५,७८४ रुपये प्रति १० ग्रॅम झालाय. जीएसटीसह २३ कॅरेट सोन्याची किंमत ७७,६४५ रुपये आहे. ३ टक्के जीएसटीनुसार त्यात २२६१ रुपयांची भर पडलीये.

आज २२ कॅरेट सोन्याचा भाव २८८ रुपयांनी कमी होऊन ६९,३२९ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. आज जीएसटीमुळे तो ७१४०८ रुपयांवर पोहोचला. यात जीएसटी म्हणून २०७९ रुपयांची भर पडली आहे.

दुसरीकडे, १८ कॅरेट सोन्याचा भाव आज २३६ रुपयांनी कमी झाला असून तो ५६,७६५ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं उघडला. १७०२ रुपये जीएसटीसह १८ कॅरेट सोन्याचा भाव आता ५८,४६७ रुपये झालाय. त्यावर ज्वेलरी मेकिंग चार्ज आणि ज्वेलर्सचा नफा यांचा समावेश नाही.

तर दुसरीकडे १४ कॅरेट सोन्याचा भाव १२५ रुपयांनी कमी होऊन ४६,९६० रुपये झालाय. १३२८ रुपयांच्या जीएसटीसह त्याची किंमत ४५,६०५ रुपये प्रति १० ग्रॅम झाली. जीएसटीसह एक किलो चांदीचा भाव ९२,२६५ रुपयांवर पोहोचलाय.