Titan Share Price: अर्थमंत्र्यांची एक घोषणा अन् रतन टाटांची कंपनी झाली मालामाल, गुंतवणूकदारांचीही चांदी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 11:59 AM2024-07-24T11:59:22+5:302024-07-24T12:12:15+5:30

Titan Share Price: टायटनच्या शेअरमध्ये तेजी, कंपनीचा मार्केट कॅप वाढला...

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर पगारदार वर्ग फारसा खूश नसला तरी, काही कंपन्यांनामात्र मोठा फायदा झाला आहे. अर्थसंकल्पात सोने आणि चांदीवरील आयात शुल्क 15 टक्क्यांवरून 6 टक्के करण्यात आले आहे. तसेच, प्लॅटिनमवरील शुल्कही 6.4 टक्के करण्यात आले आहे.

अर्थमंत्र्यांनी केलेल्या या घोषणेनंतर, मंगळवारी टायटन कंपनी, सेन्को गोल्ड लिमिटेड, पीसी ज्वैलर लिमिटेड, कल्याण ज्वैलर्स इंडिया लिमिटेड आदि कंपन्यांच्या शेअर्समध्ये 12% पर्यंतची तेजी दिसून आली आहे. रतन टाटा यांची प्रीमियम कंपनी टायटनचा शेअरच जवळपास 7 टक्क्यांनी वधारला आहे.

टायटनच्या शेअरमध्ये तेजी, कंपनीचा मार्केट कॅप वाढला - टायटन कंपनीचा शेअर मंगळवारी 3490 रुपयांपर्यंत वधारला. मात्र नंतर 3468 रुपयांवर बंद झाला. अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान सेन्को गोल्डच्या शेअर्समध्येही वाढ दिसून आली. हा शेअर 948.80 वर खुला झाला. नंतर 1054.35 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला आणि त्यानंतर 987.55 रुपयांवर बंद झाला.

निफ्टी 50 शेअरमध्ये गोल्‍ड ज्‍वैलरी संबंधित ज्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली, त्यात टायटन पहिल्या क्रमांकावर आहे. मंगळवारी टायटनच्या शेअरमध्ये आलेल्या तेजीने कंपनी कंपनीचे मुल्य जवळपास 19000 कोटी रुपयांनी वाढले आहे.

व्यवहाराच्या एकाच सत्रात गुंतवणूकदारही मालामाल - टायटन कंपनीच्या शेअरमध्ये मंगळवारी आलेल्या तेजीनंतर, ट्रेडिंग सत्राच्या शेवटी, हा शेअर 215.55 (6.63%) च्या वाढीसह 3468.15 रुपयांवर बंद झाला. आगामी काळात सोन्याच्या दागिन्यांशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये आणखी तेजीची शकता आहे.

कंपनीचे मार्केट कॅप 307897 कोटी रुपयांवर - टायटनच्या शेअर्समधील तेजीचा फायदा थेट गुंतवणूकदारांबरोबरच कंपनीच्या मूल्यांकनाच्या रूपातही झाला आहे. शेअर्समध्ये आलेल्या 6.63% तेजीनंतर, कंपनीचे मार्केट कॅप 307897 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. एका दिवसापूर्वी कंपनीचे मार्केट कॅप 288757 कोटी रुपये एवढे होते.

कंपनीचे मार्केट कॅप 19140 कोटी रुपयांनी वाढले - अशाप्रकारे, अर्थसंकल्पात कण्यात आलेल्या घोषणेमुळे कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये सुमारे 19140 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सराफा बाजार आणि एमसीएक्‍सवर परिणाम - सोन्या-चांदीवरील आयात शुल्क 9 टक्क्यांनी कमी करण्याच्या अर्थमंत्र्यांच्या निर्णयाचा परिणाम सराफा बाजारातही दिसून आला आहे. मंगळवारी सयंकाळी चांदीचा भाव 88196 रुपयांवरून 84919 रुपये प्रति किलोपर्यंत घसरला. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73218 रुपये प्रति 10 ग्रॅमवरून घसरून 69602 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला. एमसीएक्सवरही या दोन्ही धातूंच्या किमतीत मोठी घसरण झालयाचे दिसत आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)