Domino's :ह्युंदाई, कियानंतर डॅामिनोझचे काश्मीरवर ट्वीट; वादानंतर मागितली माफी By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 11:39 AM 2022-02-09T11:39:22+5:30 2022-02-09T11:42:50+5:30
'या देशाला आम्ही आमचे घर मानतो, देशाच्या वारसाचे रक्षण करण्यासाठी आम्ही येथे सदैव उभे आहोत. या देशाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीचा आम्हाला अभिमान आणि आदर आहे.' अमेरिकन पिझ्झा रेस्टॉरंट चेन डोमिनोजची भारतीय शाखा डोमिनोज इंडियाने तथाकथित 'काश्मीर सॉलिडॅरिटी डे' निमित्त काश्मीरमधील लोकांशी एकता व्यक्त करणारे ट्विट समोर आल्यानंतर माफी मागितली आहे.
डॉमिनोज इंडियाने मंगळवारी ट्विटरुन म्हटले की, गेल्या 25 वर्षांपासून या देशाला आम्ही आमचे घर मानतो. या देशाच्या वारसाचे रक्षण करण्यासाठी आम्ही येथे सदैव उभे आहोत. या देशाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीचा आम्हाला अभिमान आणि आदर आहे.
इंस्टाग्रामवर, कंपनीने म्हटले आहे की, आम्ही देशाबाहेर डोमिनोजच्या सोशल मीडिया हँडल्सवर प्रकाशित केलेल्या काही पोस्टबद्दल दिलगीर आहोत आणि दिलगीर आहोत.
एक ब्रँड म्हणून आम्ही भारताचा आदर करतो आणि नम्रता, कृतज्ञता आणि अभिमानाने, आम्ही ग्राहकांना सेवा देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा आदर करतो.
ही भारताविरोधी पोस्ट 5 फेब्रुवारी 2020 पासून व्हायरल होत आहे. दरवर्षी हा दिवस पाकिस्तानमध्ये 'काश्मीर एकता दिवस' म्हणून साजरा केला जातो.
यापूर्वी Hyundai Motors, Kia Motors, KFC आणि Pizza Hut सारख्या बहुराष्ट्रीय ब्रँडनेदेखील पाकिस्तानमधून तत्सम पोस्ट्स केल्या होत्या. पण, त्यानंतर त्यांनाही माफी मागावी लागली होती.