airlines bust in 21 year before jet airways
गेल्या 21 वर्षांत देशातील 'या' एअरलाईन्स पडल्या बंद; लाखो रोजगार गेले By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 10:08 AM2019-04-19T10:08:44+5:302019-04-19T10:26:16+5:30Join usJoin usNext आठ हजार कोटी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या जेट एअरवेजच्या प्रशासनाने बुधवारी ही सेवा तात्पुरती बंद करत असल्याची घोषणा केली. जेट एअरवेजला आर्थिक अरिष्टातून बाहेर काढण्यासाठी स्टेट बँक व इतर बँकांकडून आर्थिक मदत मिळवण्यात अपयश आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतात गेल्या 21 वर्षात बऱ्याच भारतीय विमान कंपन्या बंद पडल्या आहेत. वायुदूत 20 जानेवारी 1981 रोजी 'वायुदूत' ही भारतीय विमान कंपनी सुरू झाली होती. मात्र 1987 मध्ये ही कंपनी बंद पडली.सहारा एअरलाईन्स 1991 मध्ये सहारा एअरलाईन्स कंपनीच्या विमान सेवेला सुरुवात झाली. 2007 मध्ये ही कंपनी 'जेट एअरवेज'ने विकत घेतली.ईस्ट- वेस्ट एअरलाईन्स ईस्ट- वेस्ट एअरलाईन्स विमान कंपनी खासगी सेवा देत होती. या कंपनीची सुरुवात 1992 मध्ये झाली. 1996 मध्ये या विमान कंपनीचा कारभार ठप्प झाला. दमानिया एअरवेज परवेझ दमानिया यांनी 1993 मध्ये दमानिया एअरवेज ही कंपनी सुरू केली होती. मात्र 1997 मध्ये या विमान कंपनीची सेवा बंद झाली.मोदीलफ्ट मोदीलफ्ट ही विमानसेवा कंपनी 1993 मध्ये सुरू झाली होती. अजय सिंह यांनी त्यानंतर ती विकत घेतली आणि 2005 मध्ये त्याचं नाव बदलून ते स्पाइसजेट असं करण्यात आलं. अर्चना एअरवेज 1993 मध्ये अर्चना एअरवेज ही कंपनी सुरू करण्यात आली होती. मात्र 2000 मध्ये ही कंपनी बंद झाली. एअर डेक्कन 2003 मध्ये एअर डेक्कन या कंपनीची सुरुवात झाली होती. मात्र 2007 मध्ये किंगफिशरने ती विकत घेतली. किंगफिशर विजय माल्ल्या याची 'किंगफिशर' ही विमान कंपनी प्रसिद्ध होती. मात्र कंपनीवर कर्ज असल्यामुळे 2012 मध्ये ही कंपनी बंद झाली.टॅग्स :विमानजेट एअरवेजairplaneJet Airways