airtel give 4 lakh rupees benefits with 2 recharge plan and many schemes
तुमच्याजवळ Airtel चे सिम असेल तर मिळेल 4 लाखांचा फायदा, जाणून घ्या कसा? By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 06:00 PM2021-08-07T18:00:04+5:302021-08-07T18:17:10+5:30Join usJoin usNext airtel : कंपनी तुम्हाला रिचार्ज योजनेवर 4 लाख रुपयांचा थेट लाभ देत आहे. नवी दिल्ली : सध्या रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन आयडिया या कंपन्या सातत्याने काही ना काही नवे प्लॅन्स आणण्याचे प्रयत्न करत आहेत. अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करणे आणि ग्राहकांना आपल्याकडे टिकवून ठेवण्यासाठी कंपन्या प्रयत्न करताना दिसतात. दरम्यान, जर तुमच्याजवळ एअरटेल (Airtel) सिम असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनी तुम्हाला रिचार्ज योजनेवर 4 लाख रुपयांचा थेट लाभ देत आहे. 279 रुपयांच्या रिचार्ज प्लानवर हा लाभ उपलब्ध आहे. जीवन विमा किंवा आरोग्य विम्याचा लाभ घेण्यासाठी प्रीमियम भरावा लागतो, परंतु काही कंपन्या किंवा सरकारी योजना तुम्हाला जीवन किंवा आरोग्य विमा मोफत देतात.Airtel देणार 4 लाख टर्मचा जीवन विमा एअरटेल त्याच्या दोन प्रीपेड रिचार्जसह विनामूल्य मुदत जीवन विमा देते. हा प्लॅन 279 आणि 179 रुपयांच्या रिचार्जवर उपलब्ध आहे. 279 रुपयांच्या प्लॅनवर इतर लाभासह 4 लाख रुपयांचा टर्म लाईफ इन्शुरन्स उपलब्ध आहे. त्याचबरोबर 179 रुपयांच्या प्रीपेड रिचार्जवर 2 लाखांचा जीवन विमा आहे.जन धन खात्यावर विमा जन धन योजनेअंतर्गत खुल्या बँक खात्यासह RuPay डेबिट कार्डवर 30,000 रुपयांचे जीवन विमा संरक्षण आणि 2 लाख रुपयांचे वैयक्तिक अपघात विमा संरक्षण आहे.PNB कडून मोफत अपघाती विमा पंजाब नॅशनल बँक रुपे प्लॅटिनम डेबिट कार्डवर 2 लाख रुपयांचा विनामूल्य अपघाती विमा देते. यासह आपल्याला अनेक विशेष फायदे देखील मिळतील.EPFO देतेय 7 लाख रुपयांचे विमा संरक्षण ईपीएफओ सदस्यांना कर्मचारी ठेव लिंक्ड इन्शुरन्स स्कीम (EDLI Insurance cover) अंतर्गत विमा संरक्षणाची सुविधा देखील मिळते. योजनेत नामनिर्देशित व्यक्तीला जास्तीत जास्त 7 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते.LPG वर 50 लाख रुपयांचा विमा एलपीजी कनेक्शनसह ग्राहकाला वैयक्तिक अपघाताचे संरक्षण मिळते. एलपीजी सिलिंडरमधून गॅस गळती किंवा स्फोट झाल्यामुळे दुर्दैवी अपघात झाल्यास 50 लाख रुपयांपर्यंतचा हा विमा आर्थिक मदतीच्या स्वरूपात आहे. टॅग्स :एअरटेलतंत्रज्ञानव्यवसायAirteltechnologybusiness