जबरदस्त! Airtel ने लॉन्च केले नवीन 5g बूस्टर पॅक, जाणून घ्या काय आहेत प्लान्स By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 11:57 AM 2024-07-20T11:57:44+5:30 2024-07-20T12:02:01+5:30
गेल्या दिवसापूर्वी मोबाईल कंपन्यांनी आपल्या प्लॅनच्या किंमती वाढवल्या. यामुळे ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. आता एअरटेलने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाने त्यांच्या टॅरिफ योजनांच्या किमती वाढवल्या आहेत. मात्र, त्यानंतर या कंपन्यांनी अनेक आकर्षक योजनाही लॉन्च केल्या आहेत. यात भारती एअरटेलने एक नवीन 5G बूस्टर पॅक लॉन्च केला आहे.
या प्लॅनमध्ये, कंपनी वापरकर्त्यांना 1GB प्रतिदिन आणि 1.5GB प्रतिदिन प्लॅनवर अमर्यादित 5G डेटा देत आहे. याशिवाय अनेक फायदेही दिले जात आहेत.
भारती एअरटेलने हा बूस्टर पॅक तीन स्तरांवर लॉन्च केला आहे, रुपये 51, रुपये 101 आणि रुपये 151. हे पॅक अनुक्रमे अतिरिक्त 3GB, 6GB आणि 9GB 4G डेटासह अमर्यादित 5G डेटा देत आहेत.
हा डेटा बूस्टर पॅक फक्त विद्यमान प्लॅनवर सुरू केला जाऊ शकतो, त्याची वैधता फक्त आताच्या टॅरिफ प्लॅनवरच असेल.
रिलायन्स जिओने आपल्या यूजर्सला आकर्षित करण्यासाठी यापूर्वी असे अनेक डेटा पॅक लॉन्च केले आहेत. Jio बूस्टर पॅक अमर्यादित 5G डेटा देखील देतात. जिओ प्लॅनमध्ये काही मर्यादा आहेत.
भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओने त्यांच्या टॅरिफ प्लॅनमध्ये 3 जुलैपासून नवीन दर लागू केले आहेत. नवीन अमर्यादित व्हॉईस प्लॅनमध्ये, दर 179 रुपयांवरून 199 रुपये, 455 रुपयांवरून 599 रुपये आणि 1,799 रुपयांवरून 1,999 रुपये करण्यात आला आहे. Vodafone-Idea (Vi) ने त्यांच्या प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनच्या किमती देखील वाढवल्या आहेत.