आइन्स्टाईनच्या १४ पानी हस्तलिखीताचा लिलाव तब्बल १०.७ कोटींना By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 01:29 PM 2023-09-29T13:29:05+5:30 2023-09-29T13:46:59+5:30
जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या विज्ञानातील योगदानाचे स्पष्टीकरण दुर्मीळ हस्तलिखितात आहे. जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या विज्ञानातील योगदानाचे स्पष्टीकरण दुर्मीळ हस्तलिखितात आहे.
या हस्तलिखिताचा तब्बल १०.७ कोटी रुपयांमध्ये लिलाव करण्यात आला. या हस्तलिखितावर आइन्स्टाईन यांची स्वाक्षरी आहे.
अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा विशेष सापेक्षता सिद्धांत (१९०५) आणि सामान्य सापेक्षता (१९१५)
ज्ञानातील त्यांचे मोलाचे योगदान आणि त्यांची प्रवासयात्रा यांचा उल्लेख या हस्तलिखितात आहे.
२३ सप्टेंबर रोजी चीनमधील वाल्डोर्फ अस्टोरिया शांघाय येथे लिलाव आयोजित करण्यात आला होता.
३ फेब्रुवारी १९२९ : न्यूयॉर्क टाइम्सच्या विशेष पुरवणीत हे हस्तलिखित प्रथम प्रकाशित.
१४ पानांचे हे हस्तलिखित जर्मन भाषेत लिहिलेले आहे.
आइन्स्टाईन हे विज्ञानातील विशेष सापेक्षता सिद्धांत (१९०५) आणि सामान्य सापेक्षता सिद्धांत (१९१५) या दोन सर्वात प्रसिद्ध योगदानांसाठी प्रसिद्ध आहेत.