Amazon आपल्या सर्वात मोठ्या भारतीय सेलर Cloudtail बरोबर संपवणार पार्टनरशिप; जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 10:02 AM2021-08-10T10:02:38+5:302021-08-10T10:08:10+5:30

दिग्गज ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon.com Inc आणि Cloudtail नं आपली पार्टनरशीप संपवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षी संपणार करार.

दिग्गज ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon.com Inc आणि त्यांचा सर्वात मोठा सेलर Cloudtail नं आपली पार्टनरशीप संपवण्याचा निर्णय घेतला आहे.

Amazon च्या प्लॅटफॉर्मवर Cloudtail ला अधिक प्राधान्य दिलं जात आहे, या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर दोन्ही कंपन्यांच्या या निर्णयामुळे पडदा पडणार आहे.

Cloudtail ही कंपनी Prione Buisness Catamaran नावाच्या कंपनीच्या पूर्ण मालकीची कंपनी आहे. Amazon.com Inc आणि Caramaran यांनी जॉईंट व्हेन्चरच्या रूपात Prione Business Services ची स्थापना केली होती.

Amazon.com Inc आणि Catamaran यांच्या जॉईंट व्हेंन्चरच्या परिचालनाशी निगडीत करार १९ मे २०२२ पुन्हा होणं अपेक्षित होतं.

परंतु यादरम्यान, दोन्ही कंपन्यांनी मिळून एक निवेदन जारी केलं आहे. १९ मे २०२२ नंतर हा करार पुढे वाढवला जाणार नसल्याचा निर्णय त्यांनी एकत्र जाहीर केला आहे.

फेब्रुवारी महिन्यात रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या एका अहवालात अॅमेझॉननं अनेक वर्षांपासून Cloudtail सह काही ठराविक विक्रेत्यांनाच प्राधान्य दिलं असल्याचं म्हटलं होतं.

याचा वापर भारताच्या परदेशी गुंतवणूकीच्या नियमांतून वाचण्यासाठी केला गेला होता, असंही त्यांनी नमूद केलं होतं.

दरम्यान, यानंतर अॅमेझॉननं स्पष्टीकर देत कोणत्याही विक्रेत्यांना आपण प्राधान्य देत नसल्याचं म्हटलं होतं. तसंत त्या त्या ठिकाणच्या कायद्यांचं कंपनी पालन करत असल्याचंही सांगितलं होतं.

दरम्यान Amazon आणि Cloudtail यांनी करार पुन्हा न करण्याचा निर्णय का घेतला याची माहिती मात्र दिली नाही.

यादरम्यान सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचनं Amazon आणि Flipkart यांच्याविरोधात सुरू असलेल्या अँटीट्रस्ट तपासामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

अशा प्रकारच्या तपासासाठी कंपन्यांनी स्वत: पुढे आलं पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठानं नमूद केलं.

यापूर्वी सेबीनं या कंपन्यांच्या विरोधात तपासाचे आदेश दिले होते. या निर्णयाविरोधात दोन्ही कंपन्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. तसंच हा तपास थांबवण्याची विनंतही न्यायालयाकडे करण्यात आली होती.