Amazon सेलमध्ये स्मार्टफोन्सवर मिळतायत १० हजारांपर्यंत ऑफर्स; २६ जुलैपासून घेता येणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 02:50 PM2021-07-20T14:50:27+5:302021-07-20T14:54:54+5:30

२६ जुलै आणि २७ जुलै रोजी Amazon Prime Day Sale चं आयोजन करण्यात आलं आहे.

Amazon Prime Day Sale चं २६ आणि २७ जुलै रोजी आयोजन करण्यात आलं आहे. दोन दिवसांचा हा सेल अॅमेझॉनच्या प्राईम ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दरवर्षी आयोजित केला जातो.

यामध्ये स्मार्टफोन्स, लॅपटॉप आणि अन्य अॅक्सेसरीजवर सूट दिली जाणार आहे. याचाच अर्थ या दोन दिवसांमध्ये ग्राहकांना सर्वात स्वस्त वस्तू विकत घेता येणार आहेत.

Amazon नं अद्याप कोणत्या वस्तूंवर किती सूट दिली जाईल याची माहिती दिली नाही. परंतु ज्या प्रीमिअम स्मार्टफोन, गॅझेट्सची नावं दिली आहे त्यावर मोठी सूट उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

Amazon नं दिलेल्या माहितीनुसार कंपनी प्रीमिअम स्मार्टफोन्सवर १० हजार रूपयांपर्यंतची सूट देणार आहे. तर दुसरीकडे लॅपटॉपवरती ३५ हजार रूपयांची सूट देणार आहे.

कंपनी प्राईम डे सेलदरम्यान OnePlus, Xiaomi, Samsung, Apple, HP, boAt, Sony, Amazfit, Lenovo सारख्या वस्तूंवर सूट देणार आहे.

याशिवाय कंपनी काही ठराविक बँकांवरही ऑफर्स देणार आहे. जर तुम्ही एचडीएफसीचे ग्राहक असाल तर बँक तुम्हाला डेबिट आणि क्रेडिट कार्डावरील ईएमआयच्या देवाणघेवाणीवर १० टक्क्यांचा इन्स्टन्ट डिस्काऊंट देईल. याशिवाय कंपनीकडून जुना फोन घेऊन नव्या फोनवर डिस्काऊंटही देण्यात येईल.

कंपनी प्रीमिअम स्मार्टफोन्ससोबतच मिड रेज आणि बजेट स्मार्टफोन्सवरही सूट देणार आहे. यामध्ये iPhone 11, iPhone 12 Pro, OnePlus 9, OnePlus 9 Pro, Samsung Galaxy Note 20 यांच्यासह अन्य फोन्सचा समावेश आहे.

याशिवाय Amazon OnePlus Nord CE 5G, Redmi Note 10 Pro Max, Redmi Note 10s, Samsung Galaxy M31s सारख्या अन्य फोन्सचाही समावेश आहे.

यासाठी जर तुम्हाला एखादा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर यादरम्यान तुम्हाला अनेक डिस्काऊंट ऑफर्स मिळतील. Amazon सेलदरम्यान Boat Airdopes 441, OnePlus Buds Z आणि Sony WF-1000XM3 वर कंपनी डील्स ऑफर करत आहे.

याशिवाय अॅमेझॉन Airdropes 1999 रूपये, OnePlus Buds Z 2999 रुपये आणि Sony WF-1000XM3 14,990 रूपयांत मिळण्याची शक्यता आहे.