Anand Mahindra: आनंद महिंद्रांनी केली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची स्तुती; हे ठरले कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 04:58 PM2021-07-17T16:58:00+5:302021-07-17T17:08:33+5:30

Anand Mahindra, Nitin Gadkari on Pune-Nashik Bypass: आनंद महिंद्रांनी नुकतीच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची स्तुती केली आहे. गडकरी यांनी एक ट्विट केले होते. त्यांचे ट्विट रिट्विट केले आहे.

देशातील प्रसिद्ध उद्योगपती महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) लोकांची मदत करण्यासोबत सोशल मीडियावर नवनवीन शोधून त्याची प्रशंसा करतात. सरकारवर अनेकदा टीका करण्याबरोबरच महिंद्रा चांगल्या कामांची स्तुती करण्यासही मागे पाहत नाहीत. (Anand Mahindra shares nitin gadkari's tweet.)

आता आनंद महिंद्रांनी नुकतीच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची स्तुती केली आहे. गडकरी यांनी एक ट्विट केले होते. त्यांचे ट्विट रिट्विट केले आहे.

उद्योग जगत सरकारकडून खूप काळापासून दिलासा मिळेल याची वाट पाहत होते, असे महिंद्रा यांनी म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी लिहिले की, नारायणगाव पुणे बायपास पुणे आणि नाशिक दरम्यान प्रवास करणाऱ्यांचा त्रास कमीकरण्यास मदत मिळणार आहे. हा बायपास खुला झाला आहे. यामुळे कृषी उत्पादने मुंबई, पुण्यासारख्या शहरांना वेगाने पोहोचणार आहेत.

गडकरी यांनी PragatiKaHighway हा हॅशटॅग वापरत या बायपासचे तीनचार फोटो पोस्ट केले होते. हे ट्विट महिंद्रा यांनी रिट्विट केले आहे.

देशातील मोठे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी नितीन गडकरी यांचे ट्विट शेअर करत केंद्र सरकारचे खूप चांगले पाऊल. आम्ही लोक याची खूप काळापासून वाट पाहत होतो. लॉजिस्टिकचे महत्वा किती आहे हे आपल्याला माहिती नसते. हे स्तुतीच्या लायक आहे, असे म्हटले आहे.

पुणे नाशिक हायवेसाठी गडकरी यांनी 2017 मध्ये 39 कोटींच्या निधीची घोषणा केली होती. यानुसार राजगुरुनगर आणि नारायण गावमध्ये वाहतूक कोंडीवर उपाय केला जाणार होता.

गडकरींनी हा बायपास लवकरात लवकर तयार करण्याचे आदेश गडकरी यांनी दिले होते. हा बायपास बनविण्यासाठी 23 कोटी रुपये देण्यात आले होते.

आनंद महिंद्रा हे नेहमी वेगवेगळ्या विषयांवरून, वेगवेगळ्या लोकांची स्तुती करत असतात. आपले मत मांडत असतात. अनेकदा वेगळे काहीतरी करणाऱ्यांना ते बक्षीसीदेखील देतात.

महत्वाचे म्हणजे नाशिकमध्ये महिंद्रा कंपनीचा मोठा उत्पादन प्रकल्प आहे. यामुळे या बाह्य वळण रस्त्याचा फायदा त्यांनाही होणार आहे.