'Reliance Capital'चा १५ रुपयांचा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदार तुटून पडले; पाहा कारण By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 03:00 PM 2022-03-16T15:00:37+5:30 2022-03-16T15:09:11+5:30
Reliance capital limited stock hits upper circuit: कर्जाच्या बोज्याखाली दबलेल्या अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कॅपिटल लिमिटेडच्या शेअर्समध्ये बुधवारीही तेजी दिसून आली. Reliance capital limited stock hits upper circuit: कर्जाच्या बोज्याखाली दबलेल्या अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्या रिलायन्स कॅपिटल लिमिटेडच्या (Reliance Capital Limited) शेअर्समध्ये बुधवारीही तेजी दिसून आली.
कंपनीच्या या शेअरमध्ये बुधवारीही तेजी दिसून आली. या शेअरमध्ये शुक्रवारपासून सातत्यानंच अपर सर्किट लागत आहे. रिलायन्स कॅपिटल या कंपनीच्या खरेदीसाठी अदानी, पिरामल, केकेआरसारख्या कंपन्यांनी रूची दाखवल्याचं वृत्त समोर आल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे.
रिलायन्स कॅपिटलचा शेअर (Reliance Capital Stocks) बुधवारी १५.८० रुपयांवर पोहोचला. यामध्ये गुरूवारी ४.९७ टक्क्यांची वाढ झाली. तर दुसरीकडे मंगळवारीही या कंपनीच्या शेअरमध्ये ४.९७ टक्क्यांची वाढ झाली होती. मंगळवारीही शेअरला अपर सर्किट लागलं होतं.
रिलायन्स कॅपिटलनं आपल्या इनसॉल्व्हेन्सी रिझॉल्युशन प्रोसिड्स अंतर्गत कंपन्यांकडून एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट मागितला होता. कंपन्यांची आता बिड करण्याची अंतिम तारीख आता वाढवून २५ मार्च करण्यात आली आहे. यापूर्वी ही तारीख ११ मार्च २०२२ होती.
पीटीआयनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार रिलायन्स कॅपिटलसाठी बिड्स जमा करणाऱ्या कंपन्यांमध्ये ऑर्पवुड, वर्दे पार्टनर्स, मल्टिपल्स फंड, निप्पॉन लाइफ, जेसी फ्लॉव्हर्स, ओकट्रीस अपोलो ग्लोबल, ब्लॅकस्टोन आणि हीरो फिनकॉर्प या कंपन्यांचा समावेश आहे.
बोलीदारांकडे दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे संपूर्ण कंपनीसाठी (रिलायन्स कॅपिटल लिमिटेड) बोली लावणे. रिलायन्स कॅपिटल अंतर्गत एकूण आठ उपकंपन्या येतात. बोलीदार यापैकी एक किंवा अधिक कंपन्यांसाठी देखील बोली लावू शकतात.
रिलायन्स कॅपिटलच्या उपकंपन्यांबद्दल सांगायचे झाले तर त्यात रिलायन्स जनरल इन्शुरन्स, रिलायन्स निप्पॉन लाइफ इन्शुरन्स, रिलायन्स सिक्युरिटीज, रिलायन्स अॅसेट री-कन्स्ट्रक्शन कंपनी, रिलायन्स होम फायनान्स आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स यांचा समावेश आहे.
कंपनीवर एकूण ४० हजार कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे सप्टेंबर २०२१ मध्ये रिलायन्स कॅपिटलने आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांना सांगितलं होतं. डिसेंबर तिमाहीत कंपनीचा तोटा १७५९ कोटी रुपयांवर आला होता. डिसेंबर २०२० च्या तिमाहीत कंपनीचा एकूण तोटा ३९६६ कोटी रुपये होता. रिलायन्स कॅपिटलची स्थापना १९८६ मध्ये धीरुभाई अंबानी यांनी केली होती.