भारतात Apple Store ची एंट्री! पहिले स्टोअर आपल्या मुंबईत झाले सुरू, पाहा रॉयल लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 12:35 PM2023-04-18T12:35:50+5:302023-04-18T12:40:39+5:30

Apple ने भारतातील पहिले स्टोअर सुरू केलं आहे. कंपनीने अगोदर ऑनलाईन स्टोअरची सुरुवात केली होती.

Apple ने अखेर भारतात आपले पहिले स्टोअर सुरु केलं आहे. कंपनीने २०२० मध्ये ऑनलाइन स्टोअर सुरू केले आणि आता ऑफलाइन स्टोअरही सुरू झाले आहे. या स्टोअरमध्ये ग्राहकांना अनेक खास अनुभव मिळतील. नुकतेच अॅपलचे सीईओ टिम कुक भारतात दाखल झाले आहेत.

अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर, आज Apple Store भारतात सुरू केलं आहे. मुंबईतील ग्राहकांना सकाळी ११ वाजल्यापासून भारतातील पहिले अॅपल स्टोअर अनुभवता येणार आहे. Apple स्टोअरच्या उद्घाटनानिमित्त Apple कंपनीचे सीईओ टिम कुकही भारतात दाखल झाले आहेत. Apple चे पहिले स्टोअर वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये सुरू होत आहे.

या स्टोअरमधून Apple भारतात आपली ऑफलाईन सेवा वाढवत आहे. कंपनीची उत्पादने याआधीही ऑफलाइन बाजारात विकली असली तरी ती सर्व अधिकृत Apple रिसेलर स्टोअरमधून विकली होती. आता तुम्हाला Apple चे स्टोअर अनुभवता येणार आहे.

स्टोअर सुरू होण्यापूर्वी टीम कुक भारतात पोहोचले आहेत. या पार्श्वभूमीवर ते विविध सेलिब्रिटींना भेटत आहेत. पहिल्यांदा त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुंकेश अंबानी यांची भेट घेतली. याशिवाय त्यांनी मुंबईतील वडा पाव ट्राय केला. हा फोटोही त्यांनी शेअर केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत अभिनेत्री माधुरी दीक्षितही उपस्थित होत्या.

मुंबई व्यतिरिक्त Apple दिल्लीतही एक स्टोअर उघडत आहे, दिल्लीतील स्टोअर २० एप्रिलला सुरू होत आहे.

Apple Store सकाळी ११ वाजता उघडेल. हे स्टोअर आठवड्याचे सातही दिवस सुरू राहणार आहे. ग्राहक सकाळी ११ ते रात्री १० वाजेपर्यंत खरेदी करू शकतात. तुम्हाला या स्टोअरमध्ये Apple ची उत्पादने इतर कोणत्याही किरकोळ विक्रेत्यापूर्वी पाहायला मिळतील.

कंपनीने आपले स्टोअर वेगळे करण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी स्टोअरच्या आत फुले, काचेच्या भिंती आणि पेंटिंग्जचा वापर करण्यात आला आहे.

कंपनीच्या मते, हे स्टोअर १००% रिन्यूएबल ऊर्जेवर काम करते. काम करणाऱ्या टीमला हिरवे टी-शर्ट देण्यात आले आहेत. या स्टोअरमध्ये १०० जणांची टीम कार्यरत असणार आहे. यात ते २० हून अधिक भाषांमध्ये संवाद साधू शकतात. कंपनीने त्याचे मूळ डिझाइन इतर Apple स्टोअर्ससारखेच ठेवले आहे.

गेल्या काही वर्षांत Apple ने भारतात आपली उपस्थिती वाढवली आहे. कंपनीने २०२० मध्ये भारतात आपले ऑनलाइन स्टोअर सुरू केले.

त्यावेळी कंपनी आपले ऑफलाइन स्टोअर देखील लॉन्च करणार होती, पण विविध कारणांमुळे त्यास विलंब झाला. स्टोअरच्या उद्घाटनासाठी टीम कुक भारतात दाखल झाली आहे.