iPhone 15 सीरीजमधून Apple ची बंपर कमाई; एक फोन बनवण्यासाठी येतो इतका खर्च...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 08:42 PM2023-10-22T20:42:01+5:302023-10-22T20:46:24+5:30

iPhone 15 Series Cost: Apple ने iPhone 15 सीरीज लॉन्च केली. ही आतापर्यंतची सर्वात महागडी सीरिज आहे.

iPhone 15 Series Manufacturing Cost: Apple ने गेल्या महिन्यात iPhone 15 सीरिज लॉन्च केली. संपूर्ण जग या सीरिजची आतुरतेने वाट पाहत होते. या नवीन सीरिजअंतर्गत कंपनीने 4 मॉडेल्स (iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max.) लॉन्च केले आहेत. iPhone 15 सीरिज Apple ची सर्वात महागडी स्मार्टफोन सीरिज आहे. मुळातच आयफोनची गणना जगातील सर्वात महागड्या स्मार्टफोन्समध्ये केली जाते. हा फोन बनवायला किती खर्च येतो, हे जाणून घ्या...

iPhone हा जगातील सर्वात प्रीमियम स्मार्टफोन, त्याच्या फीचर्समुळेच नाही तर किंमतीसाठी देखील ओळखला जातो. नवीन सीरीज अंतर्गत iPhone 15 बेस मॉडेलच्या किमतीत कोणताही फरक नाही. प्रो मॉडेल्सच्या किंमती वाढल्या आहेत. आयफोनचा उत्पादन खर्च एका रिपोर्टमधून समोर आला आहे. आयफोनच्या माध्यमातून प्रचंड पैसा कमावणारी Apple कंपनी आयफोन 15 सीरीजचे मॉडेल बनवण्यासाठी किती पैसे खर्च करते ते पाहा.

Nikkei च्या रिपोर्टनुसार, iPhone 14 मॉडेलपेक्षा iPhone 15 बनवण्यासाठी 16 टक्के जास्त खर्च येतो. या मॉडेलच्या निर्मितीच्या खर्चात सर्वात मोठी वाढ दिसून आली आहे. iPhone 15 चा निर्मिती खर्च $423 (अंदाजे रु. 35,200) आहे. अमेरिकेत त्याची सुरुवातीची किंमत $799 (अंदाजे 66,500 रुपये) आहे.

iPhone 15 Plus मॉडेलचे उत्पादन $442 (सुमारे 36,800 रुपये) आहे. यावेळी Apple ने iPhone 14 सीरीजच्या तुलनेत हा फोन बनवण्याच्या किमतीत 10 टक्के वाढ केली आहे. अमेरिकन मार्केटमध्ये iPhone 15 Plus ची किंमत $899 (सुमारे 74,800 रुपये) पासून सुरू होते.

आयफोन 15 प्रो मॉडेलच्या किंमतीबद्दल बोलायचे तर, कंपनी या फोनच्या निर्मितीसाठी 523 डॉलर्स (सुमारे 43,500 रुपये) खर्च करते. आयफोन 14 प्रो मॉडेलच्या तुलनेत यावेळी आठ टक्क्यांनी वाढ दिसून आली. यूएस मध्ये या स्मार्टफोनची किंमत $999 (अंदाजे 83,000 रुपये) पासून सुरू होते.

iPhone 15 Pro Max हा सर्वात महागडा iPhone आहे. प्रो मॅक्स मॉडेलची किंमत 12 टक्क्यांनी वाढली आहे. रिपोर्टनुसार, कंपनीने हे मॉडेल बनवण्यासाठी 558 डॉलर (सुमारे 46,447 रुपये) खर्च केले आहेत. अमेरिकेत त्याची सुरुवातीची किंमत $1,199 (सुमारे 99,800 रुपये) आहे.

येथे लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे, वर नमूद केलेल्या किंमतीत आणि भारतात बनवलेल्या iPhones च्या किमतीत फरक असू शकतो. अमेरिकन मार्केटनुसार आयफोन 15 सीरीजची किंमत वर नमूद करण्यात आली आहे. भारतातील आयफोनची किंमत वेगळी असू शकते.