Apply financial discipline to earn money; Financial crisis can be faced
पैसे कमाविण्यासाठी लावा आर्थिक शिस्त; आर्थिक संकटाचा करता येईल सामना By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 09:46 AM2023-01-04T09:46:29+5:302023-01-04T10:45:37+5:30Join usJoin usNext आज आपण जाणून घेऊया आर्थिक संकटापासून वाचविणाऱ्या पाच महत्त्वाच्या गोष्टी. नवी दिल्ली : नवे वर्ष २०२३ सुरु झाले आहे. मागील काही वर्षांत कोरोनामुळे लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. नव्या वर्षात तरी त्यापासून वाचण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी वित्तीय शिस्त आवश्यक आहे. आज आपण जाणून घेऊया आर्थिक संकटापासून वाचविणाऱ्या पाच महत्त्वाच्या गोष्टी.आपत्कालीन निधी यासाठी बँकेतील बचत खात्यात किंवा म्युच्युअल फंडाच्या लिक्विड फंडात दर महिन्याला ठरावीक रक्कम टाकू शकता. ३ महिन्यांचा घरखर्च भागेल एवढी रक्कम या निधीत हवी.आरोग्य विमा अचानक उद्भवणाच्या आजारांमुळे माणूस आर्थिक संकटात सापडतो. त्यासाठी एक आरोग्य विमा पॉलिसी असणे आवश्यक आहे. कोरोनासाठीही स्वतंत्र पॉलिसी घेऊ शकता.बजेट तयार करून त्याचे पालन करा आपल्या महिन्याच्या खर्चाचा एक ताळेबंद तयार करा. अनावश्यक खर्च किती झाला, याची माहिती तुमची तुम्हालाच त्यातून मिळेल. तो टाळून बचत वाढवा.मासिक गुंतवणूक आर्थिक गरजा भागविण्यासाठी मासिक गुंतवणूक अथवा सिस्टमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) निवडणे आवश्यक आहे.कर्ज घेण्यापासून दूर राहा सध्याच्या कालखंडात कर्ज घेण्यापासून शक्य होईल तितके दूर राहा. हप्त्यावर वस्तू घेण्याचेही टाळा. कारण, कर्जाचे हप्ते फेडायचे असतात.टॅग्स :व्यवसायगुंतवणूकपैसाbusinessInvestmentMONEY