लिस्ट होताच शेअरच्या खरेदीसाठी लोकांची झुंबड, लागलं अप्पर सर्किट; पहिल्याच दिवशी केलं मालामाल, ₹125 वर आला भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 17:52 IST2025-01-24T17:41:59+5:302025-01-24T17:52:24+5:30

कंपनीचा सेअर बीएसईवर आयपीओ प्राइस 90 रुपयांच्या तुलनेत जवळपास 34% प्रीमियमसह 120 रुपयांवर लिस्ट झाला.

स्टॅलियन इंडियाचा आयपीओ आज गुरुवारी शेअर बाजारात लिस्ट झाला. या शेअरची बीएसई आणि एनएसईवर लिस्टिंग झाली आहे. कंपनीचा सेअर बीएसईवर आयपीओ प्राइस 90 रुपयांच्या तुलनेत जवळपास 34% प्रीमियमसह 120 रुपयांवर लिस्ट झाला.

एनएसईवर हा आयपीओ जवळपास 34% प्रीमियम सह 120 रुपयांवर लिस्ट झाला. लिस्ट होताच या शेअरला 5% चे अपर सर्किट लगले आणि तो 125.99 रुपयांच्या इंट्रा डे हायवर पोहोचला. अर्थात पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना 40% हून अधिकचा नफा झाला आहे.

महत्वाचे म्हणजे, स्टॅलियन इंडिया फ्लोरोकेमिकल्सचा आयपीओ गुंतवणुकीसाठी 16 जानेवारीला खुला झाला होता, तो 20 जानेवारीला बंद झाला होता. आयपीओसाठी प्राइस बँड 85 रुपये ते 90 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आला होता.

189 पट सब्सक्राइब - तीन दिवसांत हा आयपीओ 189 पट सब्सक्राइब झाला होता. आयपीओमध्ये 1.78 कोटी इक्विटी शेअर्सचा नवा इश्यू आणि याचे प्रमोटर्स, शहजाद शेरियार रुस्तमजी यांच्याकडून ४३.०२ लाख शेअर्सची विक्री ऑफर (ओएफएस) आहे.

काय करते कंपनी? - ही कंपनी एअर कंडिशनिंग आणि रेफ्रिजरेशन, अग्निशमन, सेमीकंडक्टर उत्पादन, वाहन उत्पादन, औषधनिर्माण आणि वैद्यकीय, काचेच्या बाटल्या उत्पादन, एरोसोल आणि स्प्रे फोम अनुप्रयोगांसह विविध उद्योगांना सेवा देते.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)