CoronaVirus News: देशीतील 'ही' कंपनी प्रवाहाविरोधात पोहणार; कोरोना संकटातही पगारवाढ करणार By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 05:15 PM 2020-05-15T17:15:02+5:30 2020-05-15T17:24:53+5:30
कोरोनामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसला असून कोट्यवधी रोजगार संकटात आले आहेत. त्यामुळे अनेकांच्या डोक्यावर बेरोजगारीची टांगती तलवार आहे.
कोरोनामुळे जगभरातल्या उद्योगधंद्यांवर परिणाम झाला असून कामगार कपात, वेतन कपात सुरू झाली आहे.
कोरोनामुळे उबरनं साडे तीन हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्याचा निर्णय कालच घेतला. अवघ्या ३ मिनिटांच्या कॉलमध्ये कंपनीनं कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करत असल्याची माहिती दिली.
संपूर्ण जगातून कर्मचारी कपात, वेतन कपातीची चर्चा ऐकू येत असताना एका कंपनीनं कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ही कंपनी भारतीय आहे.
एशियन पेंट्स कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करणार आहे. कर्मचाऱ्यांचं मनोबल उंचावण्यासाठी कंपनीनं पगार वाढ करण्याचा निर्णय घेतला.
विक्री प्रक्रियेत महत्त्वाची प्रक्रिया बजावणाऱ्या कंत्राटदारांच्या खात्यातही ४० कोटी जमा करण्याचा निर्णय एशियन पेंट्सनं घेतला आहे.
कोरोना संकटाच्या काळात आम्ही आदर्श नेतृत्त्वाचं उदाहरण समोर ठेवू इच्छितो, असं कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अमित शिंगळे यांनी सांगितलं.
अवघड काळात एक संस्था म्हणून आम्ही कर्मचारी आणि कंपनीशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकासोबत आहोत, हा संदेश देण्यासाठी पगार वाढवण्याचा निर्णय घेतल्याचं अमित शिंगळे म्हणाले.
नफ्यात असताना कर्मचाऱ्यांना नोकरीवर ठेवायचं आणि तोट्यात असताना त्यांना नोकरीवर काढायचं, या सिद्धांतावर आम्ही करत नाही. संकटाच्या काळातही आम्ही कर्मचाऱ्यांसोबत ठामपणे उभे आहोत, असं व्यवस्थापकीय संचालकांनी सांगितलं.
याआधी एशियन पेंट्सनं राज्य आणि केंद्राला कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी ३५ कोटी रुपये दान केले आहेत.
कोरोनाविरुद्धच्या लढाईत देशाला मदत करण्यासाठी एशियन पेंट्स सॅनिटायझरची निर्मिती करत आहे. विरोप्रोटेक्ट नावानं कंपनीनं आपलं उत्पादन बाजारात आणलं आहे.