Ayushman Card : कोणत्या हॉस्पिटलमधून 'आयुष्मान भारत योजनेतून' मोफत उपचार होणार? जाणून घ्या प्रोसेस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 02:40 PM2024-09-29T14:40:58+5:302024-09-29T14:46:03+5:30

Ayushman Card : या योजनेत लाभार्थ्याला ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळतो. याशिवाय लाभार्थ्यांना आयुष्मान कार्डद्वारे सरकारी आणि खासगी रुग्णालयात उपचार घेता येणार आहेत.

Ayushman Card : केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी अनेक योजना लाँच केल्या आहेत. सरकारने आयुष्यमान भारत ही योजना नुकतीच लाँच केली आहे, या योजनेच्या माध्यमातून रुग्णांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात.

या योजनेत लाभार्थ्याला ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळतो. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यात सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांचाही समावेश आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला आयुष्मान कार्ड दाखवावे लागेल. सर्व लाभार्थ्यांकडे आयुष्मान कार्ड आहे. हे कार्ड दाखवल्यानंतरच लाभार्थ्याला योजनेचा लाभ मिळतो.

या योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयाची माहिती कशी घ्यायची, असा प्रश्न अनेक लाभार्थ्यांना आहेत. आयुष्मान योजनेत देण्यात आलेले रुग्णालय तपासणे अगदी सोपे आहे.

पहिल्यांदा आयुष्मान भारत योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा (pmjay.gov.in). यानंतर 'फाइंड हॉस्पिटल' या पर्यायावर क्लिक करा.

आता तुमचे राज्य, जिल्हा आणि रुग्णालय (सरकारी किंवा खासगी) भरा. यानंतर तुम्हाला कोणता आजार निवडायचा आहे ज्यावर तुम्हाला उपचार करायचे आहेत.

आता पॅनेलमेंट प्रकारात PMJAY निवडा. स्क्रीनवर दाखवलेला कॅप्चा कोड एंटर करा आणि सर्च वर क्लिक करा. यानंतर, आयुष्मान योजनेत दिलेल्या रुग्णालयांची यादी स्क्रीनवर दाखवली जाईल. लिस्टमध्ये आजारांची यादीही दिली आहे.

आयुष्मान कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आहे. त्यासाठी तुम्ही ऑनलाइन तसेच ऑफलाइन अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला आयुष्मान भारत योजनेच्या वेबसाइटवर जावे लागेल.

ऑफलाइन अर्जासाठी, एखाद्याला राज्य किंवा जिल्ह्यातील रुग्णालय किंवा आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा लागेल.