BoB मध्ये 1 मार्चपासून होणार मोठा बदल; जाणून घ्या, आता कसा करावा लागणार आर्थिक व्यवहार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 11:27 IST2021-02-09T11:05:48+5:302021-02-09T11:27:46+5:30
Bank of Baroda : 1 मार्च 2021 नंतर तुम्ही ऑनलाईन व्यवहार करू शकणार नाही, कारण BoB मध्ये मोठे बदल होणार आहेत. याबद्दल जाणून घ्या...

नवी दिल्ली : बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) मध्ये खाते असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 1 मार्च 2021 नंतर तुम्ही ऑनलाईन व्यवहार करू शकणार नाही.
गेल्या काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने देना बँक (Dena Bank) आणि विजया बँक (Vijaya Bank) विलीनीकरण केले होते. यानंतर या दोन्ही बँकांचे ग्राहक बँक ऑफ बडोदामधील ग्राहक झाले.
यामुळे 1 तारखेपासून विजया बँक (Vijaya Bank) आणि देना बँकेचे (Dena Bank) IFSC कोड बंद आहेत. म्हणजेच ग्राहकांना आता नवा IFSC कोड आवश्यक असणार आहे.
नाही करू शकणार ऑनलाइन व्यवहार ?
IFSC कोड बदलल्यानंतर ग्राहक ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करू शकणार नाहीत. बँक ऑफ बडोदाने (BOB) एक पोस्ट शेअर करून यासंबंधी माहिती दिली आहे. 1 मार्च 2021 पासून ई-विजया आणि ई-देना आयएफएससी कोड बंद केले जाणार असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले आहे.
ग्राहकांवर काय होणार परिणाम?
IFSC कोड बंद झाल्यानंतर याचा थेट परिणाम खातेदारांवर होणार आहे. कारण, कुठल्याही ऑनलाईन व्यवहारासाठी तुम्हाला बँकेचा आयएफएससी कोड लागतो. यामुळे त्वरित तुमचा नवा कोड माहिती करून घ्या अन्यथा 1 फेब्रुवारीपासून तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकत नाही.
SMS द्वारेही IFSC Code शोधू शकता?
IFSC Code तुम्ही मेसेजकरूनही मिळवू शकता. यामध्ये तुम्हाला “MIGR [Space] Last 4 digits of the old account number” असा मेसेज करावा लागेल. या मेसेज तुम्ही नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून या 8422009988 वर पाठवा.
मिस्ड कॉल करून सुद्धा हा कोड लागू करू शकता?
जर तुम्हाला IFSC कोडशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर तुम्ही या टोल फ्री क्रमांकावर 1800 258 1700 वर कॉल करून थेट बँकेशी बोलू शकता.
IFSC कोड म्हणजे काय?
IFSC कोड म्हणजे 11 अंकांचा एक कोड असतो. रिझर्व्ह बँकेकडून सर्व बँकांना हा कोड दिला जातो. याच्या सुरुवातीच्या चार अंकांवरुन बँकेचे नाव कळते. या कोडचा इलेक्ट्रिक पेमेंटसाठी वापर केला जातो. या कोडद्वारे बँकेच्या कोणत्याही शाखेला ट्रॅक करता येऊ शकते. याला तुम्ही बँक खाते आणि चेक बुकद्वारे शोधू शकता.
कधीपर्यंत मिळवू शकता चेक बुक?
बँक ऑफ बडोदाने म्हटले आहे की, ग्राहकांना त्यांच्या बँक शाखेतून 31 मार्च 2021 पर्यंत नवीन एमआयसीआर कोडसह चेक बुक मिळू शकेल. याशिवाय, तुम्ही नेट बँकिंग / मोबाइल बँकिंगद्वारे नवीन चेकबुकसाठी अप्लाय करू शकता.