'या' ३ बड्या बँकांनी घेतले मोठे निर्णय; देशातील कोट्यावधी ग्राहकांवर होणार परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 07:48 PM2020-08-28T19:48:38+5:302020-08-28T20:05:19+5:30

गेल्याकाही दिवसात देशातील मोठ्या बँकांनी महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. या काही बँका प्रायव्हेट सेक्टरमधील आहेत. आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा आणि बँक ऑफ बडौदा (BoB) या बँकांचा समावेश आहे. या निर्णयामुळे कोट्यावधी ग्राहकांवर परिणाम होणार आहे. आज आम्ही तुम्हाला याबाबत सविस्तर माहिती देणार आहोत.

बँक ऑफ बडौदा (BoB) ने आपल्या ग्राहकांसाठी कर्जावर रिस्क प्रीमियम वाढवला आहे. सोप्या भाषेत म्हणटलं बँक ऑफ बडौदा (BoB) मधून कर्ज घेणं महागात पडू शकतं.

याव्यतिरिक्त बँकेनं कर्ज देण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत. त्यात चांगल्या क्रेडिट स्कोरचाही समावेश केला आहे. म्हणजेच ज्या ग्राहकांचा चांगला क्रेडीट स्कोर असेल अशा ग्राहकांना कमी व्याज दरात लोन मिळू शकतं. तुलनेनं क्रेडिट स्कोर कमी असल्यास कर्जावर जास्त व्याज लागू शकतं.

प्रायव्हेट सेक्टरच्या आयसीआयसीआय बँकेनं शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी नवीन पाऊल ठेवलं आहे. बँकेनं सॅटेलाईटच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या शेतीच्या छायाचित्रांचे निरिक्षण करून शेतकऱ्यांना कर्ज दिलं जात आहे.

बँकेनं दिलेल्या माहितीनुसार यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचा अंदाज आल्यानं कर्ज देण्याची प्रक्रिया सोपी आणि कमी वेळखाऊ होईल. यामुळे शेतकऱ्यांचे लोन लिमीट वाढण्यास मदत होईल.

सध्या आयसीआयसीआय होम फायनँस ने वरिष्ठ नागरिकांसाठी खास एफडी स्किम सुरू केली आहे. या एफडी स्किमअंतर्गत सामान्य व्याजदरापेक्षा व्याजदर २ टक्क्यांनी जास्त मिळेल.

कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममधून पैसै काढण्यासाठी डेबिट कार्डची आवश्यकता भासणार नाही. साधारणपणे एसबीआयप्रमाए कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना कोटक नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग एपवर लॉगइन करावं लागेल. याच ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं जाईल. त्यानंतर कोड जनरेट झाल्यानंतर तुम्हाला कार्डलेस कॅश काढता येणार आहे.