Bank Charges Changing For Bank Of Baroda Customers From November 2020
खातेधारकांना जबरदस्त फटका; पुढील महिन्यापासून सर्वसामान्यांच्या खिशाला बँक लावणार कात्री By प्रविण मरगळे | Published: October 29, 2020 11:52 AM2020-10-29T11:52:17+5:302020-10-29T11:54:49+5:30Join usJoin usNext आपल्याकडे कोणत्याही बँकेत खाते असल्यास आपल्यास ही माहिती जाणून घेणे फार महत्वाचे आहे. कारण पुढच्या महिन्यापासून बँकेचे अनेक नियम बदलणार आहेत. आपल्याला माहिती असेल की, बँक आपल्याकडून बर्याच गोष्टींवर पैसे घेते? आज आम्ही तुम्हाला सांगतो की, एसएमएस सुविधेचा उपयोग, किमान शिल्लक, एटीएम आणि धनादेश याच्या वापरासाठी बँक तुमच्याकडून पैसे घेते. परंतु आता बँकांमधून पैसे जमा करण्यास व पैसे काढण्यासाठी ग्राहकांना चार्ज भरावा लागणार आहे. या चार्जची सुरुवात बँक ऑफ बडोदाने केली आहे. यावर लवकरच बँक ऑफ इंडिया, पीएनबी, एक्सिस आणि सेंट्रल बँक निर्णय घेतील. पुढील महिन्यापासून म्हणजेच नोव्हेंबर २०२० पासून ग्राहक मर्यादेपेक्षा जास्त बँकिंग करत असल्यास ग्राहकांना स्वतंत्र फी भरावी लागेल. चालू खाते, कॅश क्रेडिट लिमिट आणि ओव्हरड्राफ्ट खात्यातून पैसे जमा करणे आणि पैसे काढणे यासाठी बचत खात्यातून बँक ऑफ बडोदाने वेगवेगळे शुल्क निश्चित केले आहेत. पुढच्या महिन्यापासून ग्राहकांना एका महिन्यात तीन वेळा पैसे काढल्यानंतर प्रत्येक वेळी पैसे काढताना १५० रुपये द्यावे लागतील. केवळ तीन वेळा पैसे जमा करणे विनामूल्य असेल. बचत खात्यात खातेदारांना तीन वेळा पैसे जमा करणे विनामूल्य असेल, परंतु जर ग्राहक चौथ्यांदा पैसे जमा करतात तर त्यांना ४० रुपये द्यावे लागतील. एवढेच नव्हे, तर ज्येष्ठ नागरिकांनाही बँकांनी कोणतीही दिलासा दिला नाही. मात्र जन धन खातेधारकांना यातून थोडा दिलासा मिळाला आहे. त्यांना ठेवीवर कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही, परंतु पैसे काढण्यासाठी १०० रुपये द्यावे लागतील. सीसी, चालू आणि ओव्हरड्राफ्ट खातेधारकांनी दिवसाला एक लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा केल्यास ही सुविधा विनामूल्य असेल. परंतु जर आपण यापेक्षा अधिक रक्कम जमा केली तर बँका तुमच्याकडून पैसे घेतील अशा खातेधारकांपैकी एक लाखाहून अधिक जमा करण्यासाठी एक हजार रुपयावर १ रुपये घावा लागणार आहे. यासाठी किमान आणि कमाल मर्यादा अनुक्रमे ५० आणि २० हजार रुपये आहेत. जर सीसी, चालू आणि ओव्हरड्राफ्ट खात्यांमधून महिन्यातून तीन वेळा पैसे काढले गेले तर ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. चौथ्यांदा पैसे काढल्यास प्रत्येकवेळी १५० रुपये शुल्क आकारले जाईल. बचत खाते धारकांसाठी तीन वेळा मुदत ठेव विनामूल्य असेल. परंतु, चौथ्यांदा खातेदारांना प्रत्येक वेळी पैसे जमा करताना ४० रुपये द्यावे लागतील. पैसे काढण्याबाबत ग्राहकांकडून दरमहा तीनदा खात्यातून पैसे काढल्याबद्दल शुल्क आकारले जाणार नाही. परंतु चौथ्यांदा ग्राहकांना प्रत्येक वेळी १०० रुपये देणे बंधनकारक असेलटॅग्स :बँकbank