bank holidays list in september 2023 see full list here 2023 08 22
पहिल्या आठवड्यापासून सुट्ट्या! पुढे गणेशोत्सव, सप्टेंबर बँक हॉलिडेची यादी आली... By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 12:03 PM2023-08-22T12:03:34+5:302023-08-22T12:06:02+5:30Join usJoin usNext सप्टेंबर महिन्यात बँकांनी मोठ्या सु्ट्ट्या जाहीर केल्या आहेत. जर तुम्ही सप्टेंबर महिन्यात बँकांची कामे करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे, कारण या महिन्यात बँकांना मोठ्या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकांना सुट्ट्यांची यादी अगोदरच जाहीर करत असते. देशातील वेगवेगळ्या राज्यात या सुट्ट्या जाहीर केल्या जातात. त्या त्या राज्यातील सण आणि कार्यक्रम पाहून या सुट्ट्या जाहीर केल्या जातात. आपली बँकेत नियोजित कामे असतात. यात होम लोन, पर्सनल लोन, व्यवसायासाठी लागणारे लोन यासाठी आपले प्रयत्न सुरू असतात. यासाठी आपण बँकेत हेलपाटे मारत असतो. पण, अगोदर आपण बँकांच्या सुट्ट्यांची यादी पाहिली पाहिजे. ३ सप्टेंबर - रविवारची सुट्टी, ६ सप्टेंबर - श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त बँकेला सुट्टी, ७ सप्टेंबर रोजी बँक सुट्टी, जन्माष्टमी (श्रावण ), / श्री कृष्ण अष्टमी ९ सप्टेंबर - दुसरा शनिवार सुट्टी. १० सप्टेंबर - रविवारची सुट्टी, १७ सप्टेंबर - रविवारची सुट्टी, १८ सप्टेंबर रोजी बँकेला सुट्टी वर्षसिद्धी विनायक व्रत/विनायक चतुर्थी, १९ सप्टेंबर रोजी बँकेला सुट्टी - गणेश चतुर्थी . २२ सप्टेंबर रोजी बँकेला सुट्टी - श्री नारायण गुरु समाधी दिन, २३ सप्टेंबर रोजी बँक सुट्टी - महाराजा हरिसिंह जी यांचा जन्मदिन आणि चौथा शनिवार सुट्टी, २४ सप्टेंबर - रविवारची सुट्टी, २५ सप्टेंबर - श्रीमंत शंकरदेव यांची जन्मोत्सव. २७ सप्टेंबर - मिलाद-ए-शरीफ, २८ सप्टेंबर - ईद-ए-मिलाद ,२९ सप्टेंबर - ईद-ए-मिलाद-उल-नबी के बाद इंद्रजात्राटॅग्स :बँकभारतीय रिझर्व्ह बँकbankReserve Bank of India