तुमचेही बँकेत लॉकर आहे का? मग, पश्चाताप करण्यापूर्वी 'ही' माहिती अपडेट करा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 09:12 PM2023-02-27T21:12:04+5:302023-02-27T21:19:34+5:30

bank locker rules : बँक लॉकरच्या सुविधेशी संबंधित अनेक नियम बदलले आहेत.

तुम्ही तुमच्या मौल्यवान वस्तू जसे की दागिने, मालमत्तेची कागदपत्रे किंवा मृत्युपत्र इत्यादी सुरक्षित ठेवण्यासाठी बँकेतील लॉकरची सुविधा देखील घेतली आहे का? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे.

बँक लॉकरच्या सुविधेशी संबंधित अनेक नियम बदलले आहेत. तुम्ही यासंबंधी माहिती अपडेट करा, जेणेकरून तुम्हाला पश्चाताप करावा लागणार नाही. यामध्ये एसएमएस अलर्टपासून नुकसानभरपाईपर्यंतच्या नियमांचा समावेश आहे.

सर्वात आधी, हे जाणून घ्या की बँकेत लॉकरच्या सुविधेसाठी तुम्हाला एक निश्चित शुल्क भरावे लागेल. विविध बँकेनुसार ते वेगळे असू शकते. त्याचवेळी, बँक लॉकरमध्ये प्रवेश करताना तुमच्या गोपनीयतेची देखील पूर्ण काळजी घेतली जाते. आता अपडेट केलेले नियम जाणून घेऊया.

आता जेव्हा तुम्ही बँकेत तुमच्या लॉकरला अॅक्सेस कराल. त्यानंतर बँकेकडून तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एसएमएस अलर्ट नक्कीच पाठवला जाईल. तसेच, तुम्हाला तुमच्या ईमेल आयडीवर एक मेसेज देखील मिळेल.

आग, चोरी, दरोडा किंवा इमारत कोसळणे यासारख्या बँकेच्या निष्काळजीपणामुळे तुमच्या लॉकरमधील सामग्रीचे नुकसान झाल्यास बँक तुम्हाला किंवा तुमच्या नॉमिनीला भरपाई देईल. बँका तुम्हाला लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या 100 पट रक्कम देतील.

जर भूकंप, पूर, वीज किंवा वादळ यामुळे तुमच्या लॉकरमधील सामग्रीचे नुकसान झाल्यास त्याची कोणती जबाबदारी राहणार नाही. ग्राहकांच्या निष्काळजीपणाची जबाबदारीही बँक घेत नाही.