bank of maharashtra indian overseas bank cut mclr up to 10 basis points
'या' दोन सरकारी बँकांच्या ग्राहकांसाठी भारी गिफ्ट, एकाच वेळी घेतला मोठा निर्णय By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 08:02 PM2020-09-08T20:02:08+5:302020-09-08T20:11:44+5:30Join usJoin usNext कोरोना संकट काळात सरकारी बँकांबरोबरच खासगी बँकांनीही आपल्या ग्राहकांसाठी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. काही बँकांनी नव्या योजना सुरू केल्या आहेत. तर अनेक बँका कर्जावरील व्याजदर सातत्याने कमी करत आहेत. याचाच भाग म्हणून, बँक ऑफ महाराष्ट्र आणि इंडियन ओव्हरसीज बँकेने अपल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. या दोन्ही बँकांनी कर्जावरील व्याजदर पुन्हा कमी केला आहे. अर्थात आपण या बँकांचे ग्राहक असाल, तर आपल्याला स्वस्त दरात कर्ज मिळू शकणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्रनुसार, एक वर्ष अथवा सहा महिन्यांच्या कर्जावर मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट्स (MCLR) अनुक्रमे 7.30 टक्के आणि 7.25 टक्के असेल. बँक ऑफ महाराष्ट्रने एक दिवस, एक महिना आणि तीन महिन्यांच्या कर्जासाठी एमसीएलआरमध्ये सुधारणा करून प्रत्येकी 6.80 टक्के आणि 7 टक्के आणि 7.20 टक्के केला आहे. हा दर सोमवारपासून लागू झाला आहे. याच प्रमाणे, इंडियन ओव्हरसीज बँकेने सर्व कालावधीतील कर्जांसाठी एमसीएलआर 0.10 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. बँकेच्या एक वर्षासाठीच्या कर्जाचा एमसीएलआर 7.55 टक्के राहील. तर तीन माहिने आणि सहा महिन्यांच्या कर्जासाठी एमसीएलआर कमी करून अनुक्रमे 7.45 टक्के आणि 7.55 टक्के करण्यात आला आहे. या बँकेचे हे नवे दर 10 सप्टेंबरपासून लागू होतील.टॅग्स :बँकबँक ऑफ महाराष्ट्रमहाराष्ट्रbankBank Of MaharashtraMaharashtra