Bank Timing Alert: आजपासून बँकांच्या वेळांमध्ये मोठा बदल! आरबीआयचे आदेश, एक तासाचा फरक By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 05:33 PM 2022-04-17T17:33:17+5:30 2022-04-18T10:05:55+5:30
Bank Opening Timing Change from 18 April: आरबीआयद्वारे संचलित मार्केटच्या ट्रेडिंगच्या वेळा देखील बदलल्या आहेत. यामध्ये कॉल मनी, गवर्मेंट पेपर्स, गवर्मेंट सिक्योरिटीज, रेपो इन कॉर्पोरेट बॉन्ड्स व रूपी इंटरस्ट रेट डेरिवेटिव या बाजारांचा समावेश आहे. बँकांच्या वेळेमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आरबीआयने सोमवारपासून बँका उघडण्याच्या वेळेत बदल केला आहे. यामुळे ग्राहकांची मोठी सोय होणार असून आणखी एक तास अधिक बँका उघड्या मिळणार आहेत.
रिझर्व्ह बँकेने १८ एप्रिल, २०२२ पासून बँका उघडण्याच्या वेळेत बदल केला आहे. यापुढे बँका ९ वाजता उघडणार आहेत. कोरोना महामारीमुळे रिझर्व्ह बँकेने उघडण्याची ही वेळ कमी केली होती. आता पुन्हा ही वेळ नियमित केली जात आहे.
आरबीआयद्वारे संचलित मार्केटच्या ट्रेडिंगच्या वेळा देखील बदलल्या आहेत. यामध्ये कॉल मनी, गवर्मेंट पेपर्स, गवर्मेंट सिक्योरिटीज, रेपो इन कॉर्पोरेट बॉन्ड्स व रूपी इंटरस्ट रेट डेरिवेटिव या बाजारांचा समावेश आहे. याशिवाय अन्य बाजार देखील आजपासून १० ऐवजी सकाळी ९ वाजता उघडणार आहेत.
आरबीआयने सर्व बँकांना कार्डलेस एटीएम व्यवहाराची सुविधा लवकरच सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्राहकांना लवकरच UPI द्वारे बँक आणि त्यांच्या एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे.
कार्डलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी आरबीआय हे पाऊल उचलत आहे. यासाठी सर्व बँका आणि त्यांच्या एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा UPI द्वारे दिली जाईल.
कशासाठी? कार्डलेस कॅश ट्रान्झॅक्शनमध्ये एटीएम पिनऐवजी मोबाइल पिन वापरला जाईल, ज्यामुळे एटीएमद्वारे होणारी फसवणूक रोखण्यास मदत होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कार्डलेस ट्रान्झॅक्शनमुळे व्यवहार सोपे होतील आणि कार्डलेस ट्रान्झॅक्शनमुळे कार्ड क्लोनिंग, कार्ड चोरी आणि इतर अनेक प्रकारची फसवणूक टाळता येईल. एसबीआय सारख्या काही बँका आधीपासूनच अशाप्रकारची सेवा देत आहे.