Basil Farming Business: विश्वास ठेवा की नको ठेवू...! तुळस लाखो कमवून देणार, 15000 रुपयांत सुरु करा हा व्यवसाय By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 02:06 PM 2022-01-22T14:06:34+5:30 2022-01-22T14:14:10+5:30
Basil Farming Business: कोरोनामुळे लोकांना आता त्यांच्यातील इम्युनिटी पावर वाढविण्याची गरज भासू लागली आहे. ठिकठिकाणी आयुर्वेदिक औषधे बनविण्यात येत आहेत. जवळपास सर्व औषधांमध्ये तुळशीच्या खुडलेल्या पानांचा वापर केला जातो. बाजारात तुळशीच्या पानांची मागणी वाढू लागली आहे. कोरोनामुळे लोकांना आता त्यांच्यातील इम्युनिटी पावर वाढविण्याची गरज भासू लागली आहे. तुळस ही अशी वनस्पती आहे, जिच्यामुळे रोग प्रतिकारक क्षमता वाढते. यामुळे तुळशीचा तयार काढा किंवा घरात बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे.
ठिकठिकाणी आयुर्वेदिक औषधे बनविण्यात येत आहेत. जवळपास सर्व औषधांमध्ये तुळशीच्या खुडलेल्या पानांचा वापर केला जातो. यामुळे तुळशीच्या पानांची मागणी वाढली आहे.
तुळशीची शेती जुलै महिन्यात केली जाते. तुळशीच्या झाडांना 45x 45 सेमीच्या अंतराने लावायचे असते. तर RRLOC 12 व RRLOC 14 प्रजातीच्या रोपट्यांना 50 x 50 सेमीचे अंतर लागते. ही रोपटी लावल्यावर पाणी द्यावे लागते. तुळशीच्या शेतीचे तज्ज्ञ म्हणतात, तुळशी तोडण्याआधी १० दिवस पाणी देणे थांबवावे.
तुळशीच्या झाडाची पाने मोठी झाल्यावर या रोपाची कापणी केली जाते. जेव्हा ही झाडे फुलतात तेव्हा त्यातील तेलाचे प्रमाण कमी होते, त्यामुळे जेव्हा ही झाडे फुलू लागतात तेव्हा त्यांची काढणी करावी. या झाडांना 15 ते 20 से.मीटर उंचीवरून तोडणे चांगले आहे, जेणेकरून नवीन फांद्या लवकर येऊ शकतात.
आता प्रश्न असा येतो की हे पीक विकायचे कुठे? ही रोपे विकण्यासाठी तुम्ही मार्केटच्या एजंटशी संपर्क साधून किंवा थेट मार्केटमध्ये जाऊन ग्राहकांशी संपर्क साधून ही रोपे विकू शकता. याशिवाय, तुम्ही तुमची रोपे फार्मास्युटिकल कंपनी किंवा अशा एजन्सींना करारावर विकू शकता. या कंपन्यांमध्ये तुळशीला जास्त मागणी आहे, त्यामुळे तुम्हाला ती विकताना कोणतीही अडचण येणार नाही.
या व्यवसायात पेरणीनंतर काढणीसाठी फारशी प्रतीक्षा करावी लागत नाही. यामध्ये हे रोप फक्त 3 महिन्यांनी तयार होते आणि तुळशीचे पीक सुमारे 3 लाख रुपयांना विकले जाते. आयुर्वेदिक उत्पादने बनवणाऱ्या अनेक कंपन्यांना तुळशीची रोपे लागतात, त्यामुळे ते करारावर त्याची लागवड करतात. डाबर, वैद्यनाथ, पतंजली अशा अनेक कंपन्या तुळशीची कंत्राटी शेती करत आहेत. म्हणजेच फक्त 3 महिन्यांत तुम्हाला 3 लाखांचा बंपर नफा मिळेल.
या व्यवसायाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तुळशीची लागवड करण्यासाठी तुम्हाला फारशी गुंतवणूक करण्याची गरज नाही किंवा खूप विस्तीर्ण जमिनीत लागवड करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त ₹ 15000 ची गुंतवणूक करून हा व्यवसाय सुरू करू शकता आणि तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगद्वारेही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता.