Be financially secure this Diwali; The earlier the investment, the greater the benefit!
दिवाळीत असे बना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित; जितकी लवकर गुंतवणूक, तितका जास्त फायदा! By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 11:48 AM2022-10-25T11:48:49+5:302022-10-25T11:58:41+5:30Join usJoin usNext भविष्यासाठी आर्थिक नियोजन सुरु करण्यासाठी दिवाळी शुभ मानली जाते. दिवाळी हा खूप खास सण आहे. हा सण देशभरात नवीन सुरुवात, आनंद आणि समृद्धीची नवी पहाट म्हणून साजरा केला जातो. भविष्यासाठी आर्थिक नियोजन सुरु करण्यासाठी दिवाळी शुभ मानली जाते. या दिवाळीत स्वतःला आर्थिक सुरक्षित कसे बनवावे हे जाणून घेऊ....गुंतवणूक करताना अभ्यास करा प्रत्येक व्यक्तीच्या व त्याच्या कुटुंबाच्या गरजा व आर्थिक नियोजन वेगळे असते. मात्र, त्या सर्वांमध्ये एक गोष्ट समान आहे. आर्थिक लक्ष्य गाठण्यासाठी केलेला अभ्यास यावर योग्य पद्धतीने अभ्यास केला तर मोठी रक्कम हातात शिवाय आर्थिक फटका कमी होण्यास मदत होते.आर्थिक अडचणीत मोठा आधार कोरोना महामारीचा जगभरातील अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि उत्पन्नात घट झाली. त्यामुळे अनेकांनी गुतवणूक योजना थांबवल्या. अशा कठीण काळात अनेक कुटुबांना खात्रीशीर परतावा देणाच्या गुतवणूक योजनेचा आधार मिळाला. ज्यांनी आधीच खात्रीशीर परतावा देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक केली होती त्यांना सुरक्षा मिळाली.सर्व उपलब्ध पर्यायांचा विचार करा मुलांचे शिक्षण, लग्नाचा खर्च, मासिक मिळकत, दैनंदिन गरजा भागवण्यासाठी खर्च या सर्व बाबीचा विचार करणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीने आर्थिक उद्दिष्टे काळजीपूर्वक ठरवल्यानंतर, ती साध्य करण्यासाठी सर्व उपलब्ध पर्यायांचा विचार केला पाहिजे. तथापि, यापैकी बहुतेकांना दीर्घकालीन गुंतवणुकीची आवश्यकता असते. असे अनेक मार्ग आहेत जे तुम्हाला ते पूर्ण करण्यात मदत करतात.विम्यासोबत खात्रीशीर परतावा कोरोनाने आर्थिक नियोजनाच्या गरजांना एक वेगळी ओळख दिली. एखाद्या विशिष्ट योजनेत गुंतवणूक करून गुंतवणूकदारांना विम्यासोबत खात्रीशीर परतावा मिळतो. त्यामुळे महागाईचा सामना करणे सोपे झाले. आहे. बाजारात अशा अनेक योजना आहेत ज्यात जीवन विमा आणि गुंतवणुकीवर परतावा दोन्ही मिळतो. तुम्ही तुमच्या गरजेनुसार मर्यादित कालावधीसाठी संबंधित विमा पॉलिसी निवडू शकता.कर सवलतीचाही घेता येतो लाभ विमा संरक्षण घेणाऱ्या व्यक्तीच्या आकस्मिक मृत्यूनंतर, रक्कम त्याच्या नॉमिनीला हस्तांतरित केली जाते. गॅरंटीड उत्पादने दोन श्रेणीमध्ये विभागली गेली आहेत हमी बचत योजना आणि हमी उत्पन्न योजना. कलम ८० सी आणि कलम १० (१० डी) च्या कर सवलतीचा लाभदेखील यावर उपलब्ध आहे. या सर्व बाबींचा विचार करून. या दिवाळीत. तुम्ही खात्रीशीर जीवन विमा योजना निवडू शकता आणि तुमच्या भविष्यातील चांगल्यासाठी त्यात गुंतवणूक करू शकता. यामुळे तुम्ही आणि तुमचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या नक्कीच मजबूत व्हाल.टॅग्स :गुंतवणूकपैसाInvestmentMONEY