लोन गॅरेंटर बनण्यापूर्वी ‘या’ गोष्टींवर ठेवा लक्ष, अन्यथा वाढेल तुमची डोकेदुखी By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 12:58 PM 2022-08-26T12:58:12+5:30 2022-08-26T13:10:16+5:30
एखाद्यानं कर्जाची परतफेड न केल्यास अथवा फेडता न आल्यास त्याची परतफेड करण्याची कायदेशीर जबाबदारी ज्याची असते त्याला त्या व्यक्ती गॅरेंटर म्हणजेच जामीनदार म्हणतात. जेव्हा एखादी व्यक्ती बँकेकडून (Bank) कर्जासाठी अर्ज करते तेव्हा त्याला जामीनदाराचीही गरज असते. पण जामीनदार बनणे ही केवळ औपचारिकता नाही. जामीनदार बनून, तुम्हाला काही जबाबदाऱ्याही स्वीकाराव्या लागतात. जर तुम्ही दुसऱ्यासाठी कर्जाचे जामीनदार (Loan guarantor) झालात तर त्याचे अनेक आर्थिक अर्थही (Financial mean) आहेत. कर्जदाराने वेळेवर कर्जाची परतफेड केली नाही, तर जामीनदारासाठी ते कठीण होऊ शकते. बँका किंवा कोणतीही वित्तीय संस्था जामीनदाराशिवाय कर्ज देत नाहीत.
जेव्हा एखादी व्यक्ती बँकेकडून (Bank) कर्जासाठी अर्ज करते तेव्हा त्याला जामीनदाराचीही गरज असते. पण जामीनदार बनणे ही केवळ औपचारिकता नाही. जामीनदार बनून, तुम्हाला काही जबाबदाऱ्याही स्वीकाराव्या लागतात. जर तुम्ही दुसऱ्यासाठी कर्जाचे जामीनदार (Loan guarantor) झालात तर त्याचे अनेक आर्थिक अर्थही (Financial mean) आहेत. कर्जदाराने वेळेवर कर्जाची परतफेड केली नाही, तर जामीनदारासाठी ते कठीण होऊ शकते. बँका किंवा कोणतीही वित्तीय संस्था जामीनदाराशिवाय कर्ज देत नाहीत.
एखाद्यानं कर्जाची परतफेड न केल्यास अथवा फेडता न आल्यास त्याची परतफेड करण्याची कायदेशीर जबाबदारी ज्याची असते त्याला त्या व्यक्ती गॅरेंटर म्हणजेच जामीनदार म्हणतात. कर्जाचा जामीनदार होण्यासाठी अनेक कागदपत्रांवर स्वाक्षरी करावी लागते. याचा अर्थ तुम्हाला जामीनदार असण्याचा अर्थ माहित आहे आणि नीट विचार करूनच जामीनदार होत आहात.
नियमांनुसार, कर्जाची हमी देणारी व्यक्ती देखील कर्जाच्या कर्जदाराच्या बरोबरच कर्जदार असते. डिफॉल्ट झाल्यास, बँक प्रथम कर्जदाराला नोटीस पाठवते. उत्तर न मिळाल्यास कर्जदाराला तसेच जामीनदाराला नोटीस पाठवली जाते. बँक कर्जदाराकडून शक्य तितकी वसुली करण्याचा प्रयत्न करेल. परंतु त्यात अयशस्वी झाल्यास डिफॉल्टसाठी जामीनदार देखील जबाबदार असेल.
बँका सर्व कर्जासाठी जामीनदाराचा आग्रह धरत नाहीत. परंतु, जेव्हा हमी पुरेशी नसते आणि त्यांना कर्जाच्या परतफेडीबद्दल शंका असते, अशा परिस्थितीत ते जामीनदार मागतात. मोठ्या रकमेच्या कर्जासाठी, जामीनदार असणे आवश्यक आहे.
सर्वप्रथम तुम्ही आपल्या क्षमतेवर कर्ज घेऊन कोणा अन्य व्यक्तीला उधार देऊ शकता का हा प्रश्न स्वत:ला विचारून पाहा. तुम्ही ज्या कर्जावर हमी देत आहात त्यात कोणताही धोका नाही ना हे पाहा. CIBIL केवळ कर्जदारांची माहिती गोळा करत नाही तर जामीनदारांच्या नोंदीही ठेवते. ज्याला तुम्ही जामीनदार राहिला आहात ते कर्ज तुम्हीही घेतलं आहे असंच ग्राह्य धरलं जातं. अशा परिस्थितीत कर्जदाराने कर्जाची परतफेड केली नाही, तर जामीनदाराचा क्रेडिट स्कोर खराब होऊ शकतो.
ज्यांच्यासाठी तुम्ही कर्जाचे जामीनदार होत आहात. त्याला तुमच्या कर्जाचा विमा (Insurance) उतरवण्यास सांगा. कर्जदाराचा कोणत्याही कारणामुळे किंवा इतर कोणत्याही घटनेमुळे मृत्यू झाल्यास, कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी विमा कंपनीची असते. अशा प्रकारे तुमची अडचण वाढत नाही.